नंदुरबारमध्ये सीबी उद्यान व वॉटरपार्कचे लोकार्पण
By Admin | Updated: June 25, 2017 17:47 IST2017-06-25T17:34:25+5:302017-06-25T17:47:13+5:30
नंदुरबार येथील सहा एकरामध्ये विविध मनोरंजक दालने

नंदुरबारमध्ये सीबी उद्यान व वॉटरपार्कचे लोकार्पण
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.25 : राजे संभाजी सामाजिक व सांस्कृतिक क्रीडा मंडळ संचलित नंदुरबार नगरपालिकेच्या सीबी उद्यान व वॉटरपार्कचे उद्घाटन विधानपरिषद उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आल़े शहरातील वाघोदा रोडवर या वास्तू साकारण्यात आल्या आहेत़
अध्यक्षस्थानी आमदार सुरूपसिंग नाईक तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार अमरिशभाई पटेल, माजी मंत्री माणिकराव गावीत, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार क़ेसी़पाडवी, अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस नेहा डिसुजा, आमदार काशिराम पावरा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रजनी नाईक, माजीमंत्री पद्माकर वळवी, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा चारूलता टोकस, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती़
उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्याहस्ते प्रारंभी वाघोदा रस्त्यावरील चौकात पालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘बालपण’ या शिल्पाचे उद्घाटन करण्यात आल़े त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत पालिकेच्या सीबी उद्यान आणि वॉटरपार्कचे फित कापून उद्घाटन करण्यात आल़े आर्किटेक्ट भूषण पुराणिक यांचा गौरव माणिकराव ठाकरे यांनी केला़
गार्डन बनला सेल्फीस्पॉट
म्युङिाकल फाउंटन आणि विविध आकर्षक खेळण्यांची सुविधा असलेल्या सीबी उद्यानात पहिल्याच दिवशी लहान बालकांसह त्यांच्या पालकांची गर्दी झाली होती़ या गर्दीत ठिकठिकाणी सेल्फी घेणा:यांची मोठी गर्दी होती़ दुपारच्यावेळी रिमङिाम पावसाला न जुमानता शहरातल्या कानाकोप:यातून नागरिक याठिकाणी ‘रविवार’चा आनंद घेण्यासाठी आले होत़े
मान्यवरांनी गार्डन आणि वॉटरपार्कची पाहणी केली़ प्रसंगी त्यांच्याहस्ते वॉटरपार्कमधील विविध राईडसचे रिमोटद्वारे उद्घाटनही करण्यात आल़े