रिफाइंडमुळे वाढते चरबी; घाणा तेलाची मागणी वाढली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:36 IST2021-08-18T04:36:14+5:302021-08-18T04:36:14+5:30
म्हणून वाढत आहे हृदयरोगी आपल्या देशात हृदयरोगाचे पेशंट वाढत चालले आहेत आणि यातही विशेष गोष्ट म्हणजे पूर्वी ५० किंवा ...

रिफाइंडमुळे वाढते चरबी; घाणा तेलाची मागणी वाढली !
म्हणून वाढत आहे हृदयरोगी
आपल्या देशात हृदयरोगाचे पेशंट वाढत चालले आहेत आणि यातही विशेष गोष्ट म्हणजे पूर्वी ५० किंवा ६० वर्षे वय झाल्यानंतर होणारा हा हृदयरोग आज-काल अगदी २७-२८ वर्षांच्या तरुणांनादेखील होत आहे. याचे कारण म्हणजे आपण खात असलेल्या या रिफाइंड तेलचा आणि अशा तरुण वयातील हृदयरोगाचा निश्चितपणे एकमेकांबरोबर संबंध आहे. असले उच्च तापमानाला उकळलेले तेल स्नायूंमध्ये जळजळ निर्माण करते.
लाकडी घाण्याच्या तेलाचा पर्याय
परिणामी गावागावात पूर्वी चालणारे लाकडी घाणे बंद पडले. जे तेल पूर्वी डोळ्यासमोर तयार करून मिळायचे ते आता कुठेतरी दूरवरच्या कारखान्यात तयार होऊन चकाचक, आकर्षक पॅकिंगमध्ये येऊ लागले आहे. त्यामुळे घाण्याचे तेल हेच का? अशी विचारणा करून खरेदी करावी लागत असल्याचे बोलले जात आहे.
रिफाइंड तेल का घातक
आयुर्वेदानुसार रिफाइंड तेल शरीरात वात दोषाचा प्रकोप करते.
वात दोष वाढवते. हा वाढलेला वात लठ्ठपणा, गुडघ्याचे, सांध्याचे विकार, मणक्याचे विकार आदींमध्ये परावर्तित होतो.
डायबिटीस, कॅन्सर, हृदयरोग यांच्या शक्यता अशाप्रकारचे तेल हजारो पटीने वाढवते.
आहारतज्ज्ञ काय म्हणतात..
हे जे काही पिशवीतून किंवा कॅनमधून मिळणारे डबाबंद फिल्टर केलेले तेल आपल्या घरी येते त्याच्यावर उच्च प्रमाणात रासायनिक आणि यांत्रिक प्रक्रिया केलेली असते. या प्रक्रियेमध्ये सगळ्या प्रकारची नैसर्गिक पोषणमूल्ये त्या तेल बियातून काढून घेतली जातात. जो खाली राहतो तो चव नसलेला साका आपल्याला तेल म्हणून विकला जातो.
- डॉ.परेश पाटील, शहादा