जिल्ह्यातील 125 शाळांना ‘रिड टू मी’ हे अॅप्लिकेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 11:55 AM2019-07-21T11:55:59+5:302019-07-21T11:56:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विद्याथ्र्याना इंग्रजी शिकण्यास अडचणी येऊ नयेत म्हणून राज्यातील सर्व डिजिटल शाळांमध्ये रिड टू मी ...

'Reed to Me' application to 125 schools in the district | जिल्ह्यातील 125 शाळांना ‘रिड टू मी’ हे अॅप्लिकेशन

जिल्ह्यातील 125 शाळांना ‘रिड टू मी’ हे अॅप्लिकेशन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विद्याथ्र्याना इंग्रजी शिकण्यास अडचणी येऊ नयेत म्हणून राज्यातील सर्व डिजिटल शाळांमध्ये रिड टू मी हे अॅप्लिकेशन इन्स्टॉल केले जात आहे. यांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील 125 शाळांची निवड झाली असून तेथील शिक्षकांना अॅप्लिकेशन इन्स्टॉल करण्याबाबत कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले.
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य अनिल झोपे व शिक्षणाधिकारी एम़व्ही़कदम यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी विभाग प्रमुख अधिव्याख्याता पंढरीनाथ जाधव, विषय सहाय्यक उदय केदार, संदीप पाटील आणि देवेंद्र बोरसे यांनी अक्कलकुवा, शहादा व धडगाव तालुक्यातील डिजिटल शाळांतील शिक्षकांना अप्लिकेशन डाऊननलोड आणि इन्स्टॉल करणे, त्याचा अध्यापन कार्यात वापर करण्याविषयी मार्गदर्शन केले. तीनही तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, विषय शिक्षक, साधन व्यक्ती यांनी यासाठी मदत केली.
जिल्ह्यातील ज्या शाळांमध्ये हे अॅप्लिकेशन डाऊनलोड केले आहे, त्या शाळांमध्ये आता संगणकावर इंग्रजी विषयाची संपूर्ण क्रमिक पुस्तके, त्याचबरोबर ऑनलाइन डिक्शनरी आणि अध्यापनासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे मार्गदर्शन मिळू शकणार आह़े इंग्रजी विषयाच्या अध्यापन कार्यात मदत म्हणून उपलब्ध झालेल्या या अॅपमुळे जिल्हा परिषद शाळांमधील इंग्रजीचे अध्यापन प्रभावी होणार आह़े 
 

Web Title: 'Reed to Me' application to 125 schools in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.