जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करा- पालकमंत्र्यांची सुचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 12:36 IST2020-08-01T12:36:49+5:302020-08-01T12:36:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रतिबंधीत क्षेत्रातील प्रत्येक संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीवर अधिक भर द्यावा. वाढणारा मृत्यूदर आटोक्यात आणावा ...

Reduce the death rate in the district- Suggestion of the Guardian Minister | जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करा- पालकमंत्र्यांची सुचना

जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करा- पालकमंत्र्यांची सुचना


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रतिबंधीत क्षेत्रातील प्रत्येक संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीवर अधिक भर द्यावा. वाढणारा मृत्यूदर आटोक्यात आणावा असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यानी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पांडा, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, आदी उपस्थित होते. अ‍ॅड.पाडवी म्हणाले, प्रतिबंधीत क्षेत्रात नागरीकांच्या प्रबोधनावर भर द्या.
खाजगी कोविड रुग्णालयात शासकीय दराने सेवा दिली जाईल व नियमांचे पालन होईल यांची दक्षता घ्यावी. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. त्यासाठी रुग्णाची प्राथमिक लक्षणे असताना स्वॅब तपासणी होईल याकडे लक्ष द्यावे असे पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी यावेळी सांगितले. पालकमंत्री अ‍ॅड.पाडवी यांनी बैठकी दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. उपचारासाठी लागणारे इंजेक्शन व औषधे तात्काळ उपलब्ध करुन देण्याचे टोपे यांनी मान्य केले आहे. औषधांच्या उपलब्धतेसाठी आमदार निधीतून सहकार्य करणार असल्याचे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले. बैठकीत महिला रुग्णालयाच्या इमारतीत कोविड हॉस्पीटल सुरु करण्याबाबत तयारी, आॅक्सिजनची उपलब्धता, कोविड हॉस्पीटल आणि कोविड केअर सेंटरची क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. 

Web Title: Reduce the death rate in the district- Suggestion of the Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.