दोन डॉक्टर आणि ३० परिचारिकांची भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 13:02 IST2020-08-20T13:02:08+5:302020-08-20T13:02:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील कोरोना कक्षात वाढीव परिचारिका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज असल्याने आरोग्य विभागाने तब्बल ३० ...

दोन डॉक्टर आणि ३० परिचारिकांची भरती
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील कोरोना कक्षात वाढीव परिचारिका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज असल्याने आरोग्य विभागाने तब्बल ३० पारिचारिकांची भरती करुन घेत त्यांना कामावर नियुक्त केले आहे़ सोबतच दोन डॉक्टर आरोग्य विभागाच्या ताफ्यात रुजू झाले आहेत़
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून नवीन रुग्ण समोर येण्याचे प्रमाणही वाढले आहे़ या पार्श्वभूमीवर कोविड हॉस्पिटल, एकलव्य कोविड केअर सेंटर, शहादा आणि तळोदा येथील कोविड केअर सेंटर याठिकाणी वैद्यकीय अधिकारी तसेच स्टार्फ नर्स नियुक्त करण्यात आल्या आहेत़ १५ आॅगस्टपासून १०० खाटांचे महिला रुग्णालयही सुरू झाल्याने जिल्हा आरोग्य विभागाची क्षमता वाढली आहे़ परंतु या क्षमतेएवढा कर्मचारी वर्ग नसल्याने अडचणी येत होत्या़ साधारणा १० बेडमागे एक परिचारिक असे गणित आरोग्य विभागाने जिल्ह्यातील कोविड कक्षांसाठी ठेवले आहे़ मात्र परिचारिकांची संख्या कमी असल्याने २० बेड मागे एका परिचारिकेची नियुक्ती केली जात होती़
कोविड कक्षांमध्ये प्रशिक्षित परिचारिकांसोबत जिल्हा आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या आरोग्य सेविकांही नियुक्त केल्या गेल्या होत्या़ यानंतरही रुग्णसेवेत अडचणी येत असल्याने अखेर विभागाने ३० परिचारिकांची भरती करुन घेतली होती़ यातील २५ नर्स ह्या जिल्हा रुग्णालयाच्या कक्षात तर ५ नर्स ह्या एकलव्य सेंटरमध्ये रुजू झाल्या आहेत़ यामुळे कामकाजाचा ताण काहीसा हलका झाला आहे़
कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत आणखी दोघा फिजीशियनची भरती गेल्या आठवड्यात झाली आहे़ दोघेही जिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत़ सोबत आरोग्य विभागाने ६३ कम्युनिटी हेल्थ आॅफिसर नियुक्त केले आहेत़ यापूर्वी जिल्ह्यात १०५ सीएचओ तैनात आहेत़ यातील निम्मे सीएचओ कोविड कक्षांमध्ये तर निम्मे डॉक्टर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये नियुक्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़