जिल्ह्यात वाढीव कोरोना लसीकरण केंद्रांना मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:31 IST2021-03-10T04:31:44+5:302021-03-10T04:31:44+5:30
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत ६६ टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. २२ हजार जणांचे लसीकरण झाले आहे. ...

जिल्ह्यात वाढीव कोरोना लसीकरण केंद्रांना मान्यता
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत ६६ टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. २२ हजार जणांचे लसीकरण झाले आहे. परंतू येत्या काळात सामान्य नागरीकांना लस देण्याचे नियोजन असल्याने वाढीव केंद्र सुरु करण्यात येत आहेत. यांतर्गत ३० प्राथमिक आरोग्य केंद्र, चार ग्रामीण रुग्णालय आणि १३ खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. राज्य शासनाने या केंद्रांचा प्रस्ताव मंजूर करुन केंद्र शासनाकडे मंजूरीसाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान या केंद्रांमध्ये काम करणा-या आरोग्य विभागाच्या महिला आणि पुरुष कर्मचारींचे प्रशिक्षणही पूर्ण करण्यात आले आहे. या केंद्रांमुळे ग्रामीण भागातील लसीकरणाचा वेग वाढण्यास मदत होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान कोणत्या ३० प्राथमिक आरोग्य केंद्रांची लसीकरणासाठी वर्णी लागते हे अद्याप कळालेले नाही. परंतू यात नंदुरबार, शहादा, तळोदा, धडगाव, अक्कलकुवा आणि नवापूर तालुक्यातील निवडक आणि कार्यंक्षम आरोग्य केंद्रांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती आहे.