नाईक विद्यालयात सत्कार समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:23 IST2021-06-04T04:23:17+5:302021-06-04T04:23:17+5:30
वसंतराव नाईक विद्यालयाचे प्राचार्य सुनील सोमवंशी व विज्ञान शिक्षक भगवान खानोरे हे सेवानिवृत्त झाल्याने शालेय परिवारातर्फे त्यांचा छोटेखानी सत्कार ...

नाईक विद्यालयात सत्कार समारंभ
वसंतराव नाईक विद्यालयाचे प्राचार्य सुनील सोमवंशी व विज्ञान शिक्षक भगवान खानोरे हे सेवानिवृत्त झाल्याने शालेय परिवारातर्फे त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास सोनामाई शिक्षण संस्थेच्या संचालिका वर्षा जाधव, समन्वयक संजय राजपूत, उपप्राचार्य आर.जे. रघुवंशी, उपमुख्याध्यापक एन.बी. कोते, महिला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य भरत चाळसे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्राचार्य सोमवंशी व उपशिक्षक खानोरे यांनी १९८७ साली एकाच वेळी संस्थेत सेवेची सुरूवात केली होती. दोघांचीही ३४ वर्षे सेवा झाली असून सोमवंशी यांनी वसंतराव नाईक विद्यालयातच संपूर्ण सेवा केली तर खानोरे यांनी वसंतराव नाईक व शारदा कन्या विद्यालय अशा दोन शाळेत सेवा दिली. प्रा. संजय जाधव, वर्षा जाधव व संजय राजपूत यांनी दोघांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या. सुनील सोमवंशी, भगवान खानोरे, प्रा. आर.जे. रघुवंशी, एन.बी. कोते, प्रा. अनिल सोलंकी यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी लिपिक प्रमोद जाधव, सुनील सामुद्रे, प्रा. जे. बी. पवार, ए. ए. खान उपस्थित होते. कोरोना नियमांचे पालन करुन मोजक्या शिक्षकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.