भुलाणे ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:59 PM2018-05-28T12:59:15+5:302018-05-28T12:59:15+5:30

पाचही विहिरी कोरडय़ा : प्रभावी उपाययोजनेअभावी दरवर्षी पाणीटंचाईशी सामना

Recently the residents of the water | भुलाणे ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल

भुलाणे ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल

Next

ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 28 : तालुक्यातील भुलाणे येथे असलेल्या पाचही विहिरी कोरडय़ा झाल्या असल्याने गावक:यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे विहीर अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव सूचविण्यात आला आहे. परंतु विहीर अधिग्रहण प्रस्तावाला मंजुरी मिळाली नसल्याची माहिती माजी सरपंच शांतीलाल खर्डे यांनी दिली.
भुलाणे गावात गोरख गोसावी, मोहन शिंदे, बाजीराव पावरा, भोंगरा रस्त्यावर म्हैस नदीजवळ व रेशन दुकानदार यांच्या घराजवळ एकूण पाच विहिरी खोदण्यात आल्या आहेत. परंतु गावातील विहिरींचे पाणी आटले असल्याने व म्हैस नदीजवळील विहिरींच्या पाण्याचा वापर होत नसल्याने आणि शाळेसमोरील हातपंपास दूषित पाणी असल्याने गावक:यांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. गावाजवळील राजाराम गण्या पावरा यांच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेंतर्गत खोदण्यात आलेल्या विहिरीवरून पाणी भरावे लागते. विद्युत भारनियमनामुळे आबालवृद्धांना या विहिरीतून दोराच्या सहाय्याने जीव धोक्यात घालून पाणी काढून भरावे लागते. हीच विहीर मागीलवर्षीही अधिग्रहण करण्यात आली होती. आताही याच विहिरीचा अधिग्रहण प्रस्ताव पाठविल्याचे माजी सरपंच खर्डे यांनी सांगितले.
म्हैस नदीजवळच 2011 मध्ये विहीर खोदण्यात आली असून, मलगाव फाटय़ाजवळ बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीर्पयत जलवाहिनी टाकण्यात आली आहे. तसेच ‘हगणदरीमुक्त गाव’ या अटीवर गेल्या सात वर्षापासून पिण्याच्या पाण्याची योजना रखडली आहे. हे गाव आता 100 टक्के हगणदरीमुक्त झाले असून याठिकाणी कायमस्वरूपी  पिण्याच्या पाण्याची योजना दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामास गती देवून पाणी योजना सुरू करावी. जेणेकरून भुलाणे गावाचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ करीता पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत भुलाणे           गावही सक्रीय असून, टेकडय़ांवर भारतीय जैन संघटनेतर्फे देण्यात आलेल्या जेसीबी व पोकलॅण्डच्या सहाय्याने सीसीटी चा:यांसह  अमरधाम जवळील नाला खोलीकरणाचे काम करण्यात येत आहे. विहीर ते पाण्याच्या टाकीर्पयतच्या नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे, म्हैस नदीवर पाणी अडविण्यासाठी पाणी फाऊंडेशन, स्वयंसेवी संस्था व ग्रामस्थांच्या मदतीने गाव शिवारात उपाययोजना करण्यात येत असल्याने जमिनीत जास्तीत जास्त पाणी जिरवण्यासाठी प्रत्यन केले जात आहेत. त्यामुळे गाव पाणीदार होवून येथील पाणीटंचाई कायमस्वरूपी हद्दपार होणार असल्याची अपेक्षा ग्रामस्थांना लागून आहे.
 

Web Title: Recently the residents of the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.