The rate of papaya paid by the farmers does not have to be calculated by the traders | शेतकऱ्यांनी दिलेला पपईचा दर व्यापाऱ्यांच्या पचनी पडेना

शेतकऱ्यांनी दिलेला पपईचा दर व्यापाऱ्यांच्या पचनी पडेना

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : उत्तर भारतीय बाजारपेठेत मंदी असल्याचे कारण पुढे करत व्यापाऱ्यांनी पपईला वाढीव दर देण्यास असमर्थता दर्शवली आहे़ उत्पादक संघर्ष समिती, व्यापारी, शेतकरी व बाजार समिती यांच्यात झालेल्या बैठकीत व्यापाऱ्यांनी तीन रुपये दर कमी करण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर शेतकºयांनी तो फेटाळून लावल्याने येत्या काळात शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील संघर्ष पेटण्याची शक्यता आहे़
शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभागृहात पपईच्या दराबाबत तिढा सोडवण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, सचिव संजय चौधरी, पपई उत्पादक संघर्ष समितीचे भगवान पाटील, विश्वनाथ पाटील, राजू पाटील, दीपक पाटील, अनिल पाटील, विशाल पाटील, भरत पाटील, शेख हाजी नाजिम, हाजी सरताज, हाजी इकबाल, प्रकाशभाई राजस्थान वाले, राहुलभाई राजस्थान वाले, हाजी अहमद हाजी नाजीम हे शेतकरी आणि व्यापारी उपस्थित होते़
पाच दिवसांपूर्वी शेतकºयांनी केलेल्या मागणीनुसार व्यापाºयांनी पपईचे दर वाढवले होते़ १५ रुपये ५५ पैसे प्रतिकिलो या प्रमाणे हा दर देण्याचे निश्चित करण्यात आले होते़ परंतू पाच दिवस पूर्ण होत नाहीत तोवरच व्यापाºयांनी बाजारपेठेतील मंदीचे कारण देत दर परवडत नसल्याचे सांगण्यास सुरुवात केली आहे़ या प्रकारामुळे शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त करत दर कमी करण्यास नकार दिला आहे़ दरम्यान बाजार समितीत झालेल्या बैठकीत देण्यात येणाºया १४ रुपयांच्या दरात कपात करण्याबाबत व्यापारी आणि शेतकरी यांच्यात चर्चा करण्यात आली़


बैठकीत व्यापाऱ्यांनी पपईचे दर तीन रुपयांनी कमी करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांना दिला होता़ परंतू त्यावर एकमत झाले नसल्याने बोलणी फिस्कटली होती़ ही बोलणी पुन्हा व्हावी अशी अपेक्षा व्यापाºयांची होती़ त्यानुसार गुरुवारी रात्री बैठक घेण्यात आली़ व्यापारी शेतकºयांना १३ रुपये दर देण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले आहे़ एकीकडे दरांवरुन व्यापारी आणि शेतकरी यांच्यात चर्चा सुरु असली तरी मागील दराने पपई खरेदी करण्यात येत असल्याचे चित्र आहे़ व्यवहार सुरुच असल्याने शेतकºयांना दिलासा मिळत आहे़ गुरुवारच्या बैठकीनंतर चित्र स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे़
दरम्यान दर कमी करण्याची गळ घालणाºया व्यापाºयांना दक्षिण भारतातील पपई अडसर ठरत असल्याची माहिती समोर आली आहे़ उत्तर भारतात शहादा येथून निर्यात करण्यात येणाºया पपईला मोठी मागणी आहे़ परंतू यंदा या पपईला दक्षिण भारतातून निर्यात करण्यात येणाºया पपईसोबत स्पर्धा करावी लागत आहे़ यातून पपईची आवक वाढल्याने दर कमी झाल्याने येथील व्यापाºयांना नुकसान सहन करावे लागत असल्याचे सांगण्यात आले आहे़ यातून व्यापारी दर कमी करण्यासाठी आग्रही आहेत़


उत्तर भारतातील राज्यात नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या पपईला मागणी असल्याने व्यापारीही शेतकऱ्यांसोबत संघर्ष करणे टाळत आहेत़ यातून मार्चमध्ये उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने उत्पादन खराब होण्याची भिती असल्याने दरांबाबत ओढाताण करणे योग्य ठरणार नसल्याने व्यापाºयांकडून सांगण्यात आले आहे़ परिणामी गुरुवारी होणाºया बैठकीतून योग्य तो मार्ग निघून शहादा तालुक्यातील पपई उत्तर भारतात रवाना होणे सुरुच राहणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे़

Web Title: The rate of papaya paid by the farmers does not have to be calculated by the traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.