दोन द्वार असलेले शंकराचे दुर्मीळ मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:32 IST2021-08-23T04:32:31+5:302021-08-23T04:32:31+5:30
मुक्याला वाचा देणारे वाचा प्रकाश मंदिर ‘मु करोति वाचालम्’ हा श्लोक खरा करून दाखवणारे मंदिर प्रकाशा येथे आहे. वाचा ...

दोन द्वार असलेले शंकराचे दुर्मीळ मंदिर
मुक्याला वाचा देणारे वाचा प्रकाश मंदिर
‘मु करोति वाचालम्’ हा श्लोक खरा करून दाखवणारे मंदिर प्रकाशा येथे आहे. वाचा प्रकाश मंदिर म्हणून ते ओळखले जाते. जन्मानंतर ज्यांना लवकर वाचा येत नाही, त्यांना याठिकाणी आणून पाच, सात किंवा ११ सोमवारचा नवस केल्यास त्यांना वाचा येते म्हणून हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. म्हणूनच, या मंदिराला वाचा प्रकाश मंदिर असे म्हणतात. प्रकाशा गावातील आठवडेबाजारात खंडेराव मंदिराला लागूनच हे मंदिर आहे.
एकंदरीत प्रकाशा येथील प्रत्येक महादेवाच्या मंदिराला इतिहास आहे. याठिकाणी मुक्तेश्वर महादेव मंदिर, चिंतामणी, दूध पापेश्वर, गुप्तेश्वर, गावातील काशी विश्वेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे जरी बंद असली तरी श्रावण महिन्यात भाविक येथे येऊन बाहेरून दर्शन घेत आहेत.