सातपुड्यात फुलपाखरूंच्या दुर्मिळ प्रजाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 12:43 IST2020-09-16T12:43:21+5:302020-09-16T12:43:29+5:30
मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात फुलपाखरांच्या २८ ते ३० प्रजाती असून काही प्रजाती या केवळ ...

सातपुड्यात फुलपाखरूंच्या दुर्मिळ प्रजाती
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात फुलपाखरांच्या २८ ते ३० प्रजाती असून काही प्रजाती या केवळ सातपुड्यातच आढळणाऱ्या आहेत. दुर्मिळ प्रजातींचे संवर्धन करण्यासाठी फुलांचे रोपे, झाडे यांचे संवर्धन होणे आवश्यक आहे. परंतु जिल्ह्यात सातपुड्यातील वाढती जंगलतोडमुळे फुलपाखराच्या दुर्मिळ प्रजाती नष्ट होण्याची भिती आहे.
सातपुड्यातील जंगल विविध जैव विविधतेने नटलेले आहे. जंगलात आढळणारे विविध जीव, जंतू, पक्षी दुर्मिळ प्रजातीचे आहेत. सातपुड्याच्या जंगलाचे संवर्धन केल्यास जैव विविधता आणखी मोठ्या प्रमाणावर वाढणार असा पर्यावरण प्रेमींचा सूर आहे. सध्या फुलपाखरू महिना साजरा केला जात आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील विशेषत: सातपुड्यातील विविध फुलपाखरांच्या प्रजातींचे संवर्धन करण्यासाठी पर्यावरण प्रेमी, जैव शास्त्रज्ञ, विद्यार्थी यांनी पुढे येणे आवश्यक आहे.
पूर्वी सातपुड्यातील जंगल हे घनदाट आणि विविध जंगली वनस्पतींनी नटलेले होते. त्यावेळी जिल्ह्यात फुलपाखराच्या जवळपास ७० ते ८० प्रजाती आढळून येत असल्याचे अभ्यासकांचे म्हणने आहे. परंतु जंगलतोड वाढल्यामुळे येथील काही प्रजाती नष्ट झाल्या तर काही लगतच्या गुजरातच्या जंगलात स्थलांतरीत झाल्याचा अंदाज आहे.
गेल्या काही वर्षात सातपुड्यातील तोरणमाळ ते वाल्हेरीच्या जंगलाच्या दरम्यान तळोदा येथील संशोधक तथा प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.शशिकांत रतिलाल मगरे यांनी फुलपाखरांवर मोठ्या प्रमाणावर संशोधन केले आहे. प्राणी विज्ञान भवन कोलकाता व पुणे येथून देखील त्यांना सहकार्य मिळाले आहे.
जंगलात फुलपाखरू आणि पतंग असे दोन प्रकार आढळून येतात. जे केवळ काळे आणि पांढºया रंगाचे असतात ते पतंग असतात. त्यांचे आयुष्य दोन ते अडीच वर्ष असू शकते. तर विविध रंग छटा असणारे फुलपाखरू असतात. त्यांचे आयुष्य दोन ते अडीच महिने असते. साधारणत: पावसाळ््यात ते आढळतात. विविध नैसर्गिक फुलांच्या वनपस्पती या काळात जगंलात उगवतात. शिवाय अनेक झाडांना या काळात फुलांचा बहर येतो. त्यामुळे या काळात फुलपाखरांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. फुलपाखरू मुख्यत्वे कढीपत्ता व लिंबूच्या झाडाच्या पानाखाली अंडी घालत असतात. त्यामुळे ही दोन्ही झाडे देखील जतन करणे आवश्यक आहे. कोणत्या प्रजातींना जिल्ह्यात
कशामुळे धोका आहे
केवळ सातपुड्यात आढळणाºया रेड हेलन, पिकॉक पेन्सी, कॉमन सिल्व्हर लाईन, ब्ल्यू पेन्सी या प्रजांतींना धोका आहे. कारण सातपुड्यातील जंगलतोड आणि जंगली वनस्पतीची तोड यामुळे ही फुलपाखरू नामशेष होऊ शकतात. त्यामुळे जगंलात जंगली फूलांना वाढू द्यावे, घर, बगिचा, सार्वजनिक उद्याने या ठिकाणी फुलझाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न करावा, वन विभागानेही त्यासाठी विशेष मोहिम राबविणे आवश्यक आहे. जिल्ह्यात फुलपाखरे आढळणारी ठिकाणे
तोरणमाळच्या पठारापासून ते वाल्हेरीपर्यंतच्या सातपुड्याच्या जंगलात विविध प्रजातीची फुलपाखरू आढळतात. त्यात कॉमन एमिग्रेट, प्लेन आॅरेंज टीप, लिटील आँरेंज टीप, प्लेट टायगर, कॉमन इंडिया क्रॉ, कॉमन ग्रास येलो,टाइल्ड जे, ग्रेट आॅरेंज टीप, व्हाईट आँरेंज टीप यासह इतर विविध प्रजाती या भागात आहेत.
फुलपाखरांच्या दुर्मिळ जातींचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न होणार आहे. यासाठी अधीक संशोधन करण्यात येणार आहे. ज्या भागात जंगली फुलझाडे नामशेष होत आहेत त्या भागात ते अधिक व्यापक प्रमाणात वाढतील यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
सातपुडाचे जंगल विविध जैवविविधतेने समृद्ध आहे. या भागात आपण गेल्या ३० वर्षांपासून संशोधन करीत आहे. अनेक शोधनिबंध आपले प्रकाशित झाले आहेत. फुलपाखरांच्या दुर्मिळ प्रजातींचे या भागात संवर्धन व्हावे यासाठी प्राणी विज्ञान भवन यांच्याशी संपर्कात आहोत.
सातपुड्यातील फुलपाखरूंचे संशोधन होणे गरजेचे आहे. विविधरंगी आकर्षक असे फुलपाखरू या भागात आढळतात. याशिवाय तापी खोºयात देखील अशी फुलपाखरे मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे या जैवविविधतेचे संवर्धन आणि संशोधन होणे गरजेचे आहे. त्यासाठी पुढाकार घ्यावा. -बी.आर.पाटील,
पर्यावरण तज्ज्ञ. -प्राचार्य डॉ.शशिकांत मगरे,तळोदा महाविद्यालय.