पाणी पातळीत होतेय वेगाने घट : कोळदे परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 12:57 IST2019-02-20T12:57:32+5:302019-02-20T12:57:39+5:30

सातपैकी पाच हातपंप बंद, पाण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी

Rapid reduction in water level: Coal area | पाणी पातळीत होतेय वेगाने घट : कोळदे परिसर

पाणी पातळीत होतेय वेगाने घट : कोळदे परिसर

लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील कोळदे गावात तीव्र पाणीटंचाईच्या झळा बसत आह़े पाणी पातळीत वेगाने घट झाल्याने परिणामी गावातील सातपैकी तब्बल पाच हातपंप बंद असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आह़े गावात केवळ दोन हातपंप सुरु असून त्यावर ग्रामस्थांची पाणी भरण्यासाठी गर्दी होत आह़े 
जिल्ह्याकडे यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली आह़े पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल होत असल्यामुळे साहजिकच हातपंप तसेच कुपनलिकादेखील निरुपयोगी ठरत आहेत़ गावात दोनच हातपंप असून तेसुध्दा मोटारीव्दारे कार्यान्वित करण्यात आलेले आहेत़ त्यामुळे साहजिकच तेही अजून किती दिवस कार्यान्वित राहणार याबाबत शंकाच आह़े केवळ दोन हातपंप सुरु असल्याने पाण्यासाठी गावातील महिला तासंतास रांगेत उभ राहत असतात़ मोठय़ा मुश्किलीने महिलांना एक हंडाभर पाणी भरायला मिळत आह़े त्यामुळे यातून अनेक वेळा वाददेखील होताना दिसून येत           आहेत़ दरम्यान, येथील पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी व्यवस्थितपणे झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आह़े या गावात हातपंप वगळता इतर पाण्याचा कुठलाही स्त्रोत नसल्यामुळे  ग्रामस्थांना हातपंपावर अवलंबून राहूणच पाण्याची जुळवाजुळव करावी लागत आह़े गावातील विहिरी तर डिसेंबर-जानेवारी महिन्यातच कोरडय़ा पडल्या होत्या़ त्यामुळे येथील ग्रामस्थांना खरिप हंगामावरही पाणी सोडावे लागले होत़े उन्हाळ्याचे पुढील दिवस पाण्याअभावी कसे निघतील अशी चिंता आह़े 

Web Title: Rapid reduction in water level: Coal area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.