चित्रफित व्हायरल करण्याची धमकी देत शहाद्यात तरुणीवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 19:31 IST2019-02-17T19:31:22+5:302019-02-17T19:31:28+5:30
शहादा येथील घटना : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

चित्रफित व्हायरल करण्याची धमकी देत शहाद्यात तरुणीवर बलात्कार
नंदुरबार : शहादा येथील २४ वर्षीय तरुणीची चित्रफित सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत युवकाने तिचे अपहरण करून बलात्कार केल्याची घटना शहादा येथे घडली. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहाद्यातील गरीबनवाज कॉलनीत राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीला त्याच भागात राहणाºया अरमान सलम शेख व फराहीम मुख्तार खान या दोघांनी चित्रफित तयार करून ती व्हायरल करण्याची धमकी तरुणीला दिली. त्यानंतर दोघांनी तिला गुंगुची औषध सुंगवून जबरीने सुरत येथे नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. शहादा येथे आल्यावर मुलीने पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून अरमान सलीम शेख व फराहीम मुख्तार खान रा.गरीब नवाज कॉलनी यांच्याविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.