अल्पवयीन मुलीचे अपहरण करणा:या युवकास सश्रम कारावासची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 12:10 IST2019-02-26T12:10:25+5:302019-02-26T12:10:28+5:30
नंदुरबार : अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून तिचे अपहरण करणा:या बोकळझर, ता.नवापूर येथील युवकास न्यायालयाने तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ...

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणा:या युवकास सश्रम कारावासची शिक्षा
नंदुरबार : अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून तिचे अपहरण करणा:या बोकळझर, ता.नवापूर येथील युवकास न्यायालयाने तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. त्याच्यासोबतच्या दोन साथीदारांना निदरेष सोडण्यात आले.
बोकळझर येथील नववीत शिकणा:या अल्पवयीन मुलीवर गावातीलच महेंद्र दिलीप गावीत हा युवक एकतर्फी प्रेम करीत होता. संधी मिळेल तेंव्हा तो मुलीशी बोलण्याचा, लगट करण्याचा प्रय} करीत होता. परंतु मुलीचा त्याला नेहमीच विरोध राहत होता. 26 मे 2016 रोजी रात्री 11 ते 12 वाजेच्या सुमारास मुलगी घरासमोरील स्वच्छतागृहात गेली असता बाहेर निघाल्यावर तेथे दुचाकीवर आलेल्या महेंद्र गावीत व त्याच्या दोन साथीदारांनी तिला अडविले व जबरदस्तीने तिला दुचाकीवर बसवून पळवून नेले. आमलाण येथे नातेवाईकांकडून तो घेवून गेला.
रात्रभर तेथे ठेवल्यानंतर त्याने सकाळी मुलीला मोलगी येथे नेले. 28 मे रोजी महेंद्र याच्या आईवडिलांचा मोलगी येथे आत्याला फोन आला. दोन्हीजण तेथे असल्याची खात्री झाली. सकाळी मुलीला घेवून आमलाण व तेथून नवापूर येथे आला. नवापूरातील स्टेट बँकेच्या गोडावूनजवळ मुलीचे आईवडील व मामा भेटल्यानंतर मामा तिला शेलूड, ता.उच्छल येथे नेले.
दुस:या दिवशी बोकळझर येथील लोकांनी युवकाला या घटनेच्या सोक्षमोक्षासाठी बोलविले पण तो गेला नाही. त्यामुळे मुलगी, तिचे आई-वडील व पोलीस पाटील यांच्या सोबत नवापूर पोलीस ठाण्यात गेले. तेथे महेंद्र दिलीप गावीत व त्याच्या सोबतच्या मित्रांविरुद्ध मुलीने फिर्याद दिल्याने अपहरण व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत सहायक पोलीस निरिक्षक संतोष भंडारे यांनी नंदुरबार सेशन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश राजेश गुप्ता यांच्या कोर्टापुढे कामकाज चालले. सर्व साक्षी, पुरावे गृहीत धरून महेंद्र दिलीप गावीत यास तीन वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. त्याच्या दोन साथीदारांची निदरेष मुक्तता केली. सरकार पक्षातर्फे अॅड.व्ही.सी.चव्हाण यांनी काम पाहिले. सरकारी वकील व तपास अधिका:यांची पोलीस अधीक्षकांनी अभिनंदन केले.