घरी सोडण्याच्या बहाण्याने कामगार महिलेवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 12:46 IST2019-06-08T12:45:59+5:302019-06-08T12:46:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वीट भट्टीवर काम करणा:या मजुर महिलेस घरी सोडण्याच्या बहाण्याने तिच्याशी अतिप्रसंग करणा:या व त्याला ...

Rape of gang-raped woman due to sacking at home | घरी सोडण्याच्या बहाण्याने कामगार महिलेवर बलात्कार

घरी सोडण्याच्या बहाण्याने कामगार महिलेवर बलात्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वीट भट्टीवर काम करणा:या मजुर महिलेस घरी सोडण्याच्या बहाण्याने तिच्याशी अतिप्रसंग करणा:या व त्याला मदत करणा:या अशा दोघांविरुद्ध गुरुवारी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंदीदिगर, ता.धडगाव येथे ही घटना घडली. 
ओडा:या दलसिंग पावरा व राकेश लुला पावरा, रा.सिंदीदिगर असे संशयीतांची नावे आहेत. ओडा:या पावरा याच्या शेतात पिढीत महिला व तिची बहिण वीट भट्टीवर कामाला जातात. काम संपल्यानंतर रात्री नऊ वाजता पिढीत  महिलेला गावात सोडण्यास जातो असे सांगून सोबत नेले. त्याच्या घराच्या मागील बाजूस तिला नेत अतिप्रसंग केला. त्याच्या सोबत असलेल्या राकेश लुला पावरा याने त्याला मदत केली. 
याबाबत महिलेने घरी ही बाब सांगितल्यानंतर म्हसावद पोलीस ठाणे गाठले. तेथे फिर्याद दिल्यानंतर ओडा:या दलसिंग पावरा व राकेश लुला पावरा या दोघांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार देविदास सोनवणे करीत आहे. 

Web Title: Rape of gang-raped woman due to sacking at home