पाटलीपाडा शिवारात आढळले रानमांजर : विहिरीत पडल्याने अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 12:51 IST2018-02-17T12:51:32+5:302018-02-17T12:51:52+5:30

पाटलीपाडा शिवारात आढळले रानमांजर : विहिरीत पडल्याने अडकले
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील पाटलीपाडा शिवारात रानमांजर विहिरीत पडल्याने जखमी झाले होत़े त्यास प्राणीमित्रांनी मोठय़ा मुश्किलीने बाहेर काढून वनविभागाच्या ताब्यात दिल़े
शुक्रवारी सकाळी पाटलीपाडा शिवारात रघुनाथ पाटील यांच्या शेतातील विहिरीत बिबटय़ासारखा प्राणी असल्याची अफवा पसरली होती़ हा प्राणी बाहेर काढण्यासाठी शेतकरी पाटील यांनी अजय नागरे व हितेंद्र जाधव यांना पाचारण केले होत़े या दोघांना विहिरीत उतरून वन्य प्राण्यास बाहेर काढल़े साधारण अडीच फूट उंच आणि तीन लांबी असलेले हे रानमांजर पूर्ण वयस्कर असल्याची माहिती देण्यात आली आह़े या मांजरास अजय नागरे यांनी नंदुरबार वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या सूपूर्द करण्यात आले होत़े दुपारी वनविभागाने रानमांजराला वनक्षेत्रात सोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े