कजर्बाजारीपणामुळे रनाळेत शेतक:याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 11:39 IST2017-08-13T11:39:55+5:302017-08-13T11:39:55+5:30

Ranlet's farmer due to losers: It suits suicide | कजर्बाजारीपणामुळे रनाळेत शेतक:याची आत्महत्या

कजर्बाजारीपणामुळे रनाळेत शेतक:याची आत्महत्या


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कजर्बाजारीपणामुळे रनाळे येथे शेतक:याने आत्महत्या केली. 7 रोजी विष प्राशन केल्यानंतर 12 रोजी उपचार घेतांना शेतक:याचा मृत्यू झाला. 
बन्सीलाल टिकाराम तांबोळी (62)रा.रनाळे असे शेतक:याचे नाव आहे. तांबोळी यांच्याकडे कोरडवाहू शेती आहे. परंतु त्यातून उत्पन्न येत नाही. यावर्षी मुलीचे लगA केले. त्यासाठी इतरांकडून उसनवारीने पैसे घेतले होते. त्यामुळे कर्ज वाढले होते. त्या नैराश्येतूनच बन्सीलाल तांबोळी यांनी 7 ऑगस्ट रोजी घरात विष प्राशन केले. जिल्हा रुग्णालयात उपचार घेतांना त्यांचा 12 रोजी मृत्यू झाला. माधुरी तांबोळी यांनी खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Ranlet's farmer due to losers: It suits suicide