स्वच्छ शहरांच्या यादीत ‘नंदुरबार’चे रँकिंग सुधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 12:07 IST2020-02-12T12:07:07+5:302020-02-12T12:07:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२० या योजनेतील विजेत्यांचे नाव देशपातळीवर लवकरच घोषित होणार ...

Ranking of 'Nandurbar' improved in the list of clean cities | स्वच्छ शहरांच्या यादीत ‘नंदुरबार’चे रँकिंग सुधारले

स्वच्छ शहरांच्या यादीत ‘नंदुरबार’चे रँकिंग सुधारले

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२० या योजनेतील विजेत्यांचे नाव देशपातळीवर लवकरच घोषित होणार आहे़ परंतू तत्पूर्वी दर दिवशी स्वच्छ शहरांच्या याद्या प्रकाशित होत आहेत़ यात नंदुरबार शहर हे देशात २९ व्या स्थानी असून यापुढेही रँकिंगमध्ये सुधारण होण्याची माहिती आहे़
स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत नंदुरबार नगरपालिकेने सहभाग नोंदवला होता़ यांतर्गत शहरातील विविध भागात पालिकेने विकासकामे राबवली आहेत़ यात नागरिकांच्या जनजागृतीसह प्रत्यक्षात स्वच्छतागृहे उभारणी, कचरा कुंड्या, ओला सुका कचरा वर्गीकरणासह घनकचरा प्रकल्प सुरु आहे़ या सर्व कामांची पाहणी करण्यासाठी जानेवारी अखेरीस स्वच्छ भारत अभियानाचे केंद्रीय पथक शहरात स्वतंत्रपणे भेट देऊन गेले होते़ या पथकाने विविध ठिकाणी भेटी देत कचरा निर्मुलन आणि हगणदारीमुक्त शहराची पाहणी केल्याची माहिती आहे़ समितीने दौरा पूर्ण केल्यानंतर केंद्रीय स्तरावर शहराचे मानांकन करणे सुरु झाले आहे़ यात एक ते दीड लाख लोकसंख्या असलेल्या नंदुरबार शहराचा देशातील क्रमांक २९ असल्याची माहिती समोर आली आहे़ हे मानांकन गेल्या आठवड्यापासून स्थिर असून पुढे यात सुधारणा होण्याचे संकेत देण्यात आले आहेत़
स्वच्छ सर्वेक्षणात नंदुरबारने घेतलेल्या भरारीमुळे देशपातळीवर नावलौकिक होत असून पालिका प्रशासन सर्वेक्षणानंतरही स्वच्छ भारत अभियानाचे गांभिर्य ओळखून कचऱ्याची विल्हेवाट लावत आहे़


या उपक्रमांतर्गत हगणदारीमुक्त शहर, कचरामुक्त शहर आणि स्वच्छ शहर अशा तीन वर्गवारीनुसार तपासणी करण्यात आली आहेत़ यातून शहराला स्वच्छ भारत अभियानाच्या पोर्टलवर गुण दिल्याचे दिसत आहे़ या गुणांमध्ये समितीने केलेल्या पाहणीनुसार गुणांकन करण्यात आले आहे़ यात प्रामुख्याने शहरवासियांनी केलेल्या तक्रारींच्या निरसनाचाही समावेश आहे़ पालिकेने किती वेळात नागरिकांच्या स्वच्छतेबाबतच्या तक्रारींचा निपटारा केला याची माहिती देण्यात आली आहे़ नंदुरबार शहरातील विविध भागात स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत करण्यात आलेल्या जनजागृतीपर उपक्रमांनाही भेट देणाऱ्या समितीने गुणदान केल्याची माहिती देण्यात आली आहे़


शहरातील स्वच्छ रस्ते, गार्डन, फुटपाथ, नियमित येणाऱ्या घंटागाड्या, ओला आणि सुक्या कचºयाचे वर्गीकरण करुन त्याची योग्य पद्धतीने लावली जाणारी विल्हेवाट याचीही पाहणी गेल्या महिन्यात येथे भेट देणाºया समितीने केल्याचे सांगण्यात आले आहे़ शहरातील रस्ते दिवसातून दोन वेळा पालिका कर्मचारी स्वच्छ करत असल्याचे समाधान व्यक्त करण्यात आल्याची माहिती आहे़ या संपूर्ण प्रक्रियेचा निकाल हा फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहिर होण्याची शक्यता आहे़

Web Title: Ranking of 'Nandurbar' improved in the list of clean cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.