राँग साईडने येऊन धडक देत जखमीलाच मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 12:18 IST2020-02-12T12:18:24+5:302020-02-12T12:18:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा शहरात राँग साईडने वाहन चालवत समोरुन येणाऱ्या १५ वर्षीय मुलाला धडक देत थेट ...

राँग साईडने येऊन धडक देत जखमीलाच मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा शहरात राँग साईडने वाहन चालवत समोरुन येणाऱ्या १५ वर्षीय मुलाला धडक देत थेट मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली़ मारहाण करणाºयास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे़
शहाद्यातील बागवान गल्लीतील अबुबकर रियाज बागवान हा मुलगा गांधी पुतळा समोरुन जात असताना प्रविण पुरुषोत्तम चौधरी हा राँग साईडने दुचाकी चालवत आला़ त्याने अबुबकर यास धडक दिली़ याचा जाब विचारल्यावर प्रविण चौैधरी याने मारहाण करण्यास सुरुवात केली़ याबाबत रात्री उशिरा अबुबकर बागवान याने शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन प्रविण चौधरी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक फुलपगारे करत आहेत़ दरम्यान पोलीसांकडून रात्री उशिरा संशयित प्रविण यास ताब्यात घेतले़