धडगाव येथे रानभाजी महोत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:33 IST2021-08-19T04:33:31+5:302021-08-19T04:33:31+5:30
महोत्सवाचे उद्घाटन माजी सभापती हारसिंग पावरा यांनी केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी रतिलाल महाले, फेंदा पावरा, मंडळ कृषी अधिकारी ...

धडगाव येथे रानभाजी महोत्सव साजरा
महोत्सवाचे उद्घाटन माजी सभापती हारसिंग पावरा यांनी केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी रतिलाल महाले, फेंदा पावरा, मंडळ कृषी अधिकारी एस. जे. सोनवर, पी. बी. पाडवी, अनुप रासकर, आकाश पावरा, विनय पावरा, सुखदेव पावरा, मानसिंग पावरा आदी उपस्थित होते.
यावेळी तालुका कृषी अधिकारी रतिलाल महाले यांनी सांगितले की, रानभाज्यांमध्ये शरीराला आवश्यक असणारे विविध प्रकारचे पौष्टिक अन्नघटक असतात, त्यावर रासायनिक कीटकनाशक, बुरशीनाशक फवारणी केली जात नाही. त्यामुळे पूर्णपणे नैसर्गिक असल्यामुळे या संपत्तीचा योग्य वापर आवश्यक आहे. सातपुडा पर्वतरांगात अनेक प्रकारच्या रानभाज्यांच्या प्रजाती उपलब्ध आहेत; पण या रानभाज्यांची आजच्या पिढीला योग्य माहिती नाही. त्यामुळे आजच्या युगात या नैसर्गिक प्रथिनयुक्त रानभाज्यांच्या आयुर्वेदिक गुणाबद्दल नागरिक अनभिज्ञ असल्यामुळे नानाविध जीवघेणे आजार फोफावत आहे. कंदमूळभाज्या, फुलभाज्या, हिरव्याभाज्या, फळभाज्या पावसाळ्याच्या सुरुवातीला जंगलात आढळून येतात.
रानभाज्यांच्या संवर्धनातून आदिवासी कुटुंबांची आर्थिक स्थिती उत्तम राखण्याकरिता चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, या रानभाज्यांतून मिळणाऱ्या प्रथिनातून राज्यातील आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण सोडविले जाऊ शकते. अनेक रानभाज्यात तर शरीराला पोषक असे औषधी गुणधर्म असल्याची माहिती माजी सभापती हारसिंग पावरा यांनी दिली.
महोत्सव यशस्वीतेसाठी तालुक्यातील सर्व शेतकरी बचत गट, महिला बचत गटाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.