रामभाऊ पाटील प्रतिष्ठानतर्फे छायाचित्र प्रदशर्नाचे उद्घाटन
By Admin | Updated: July 4, 2017 12:18 IST2017-07-04T12:18:49+5:302017-07-04T12:18:49+5:30
छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनामुळे नंदुरबारची ओळख संपूर्ण राज्यात होणार आहे.

रामभाऊ पाटील प्रतिष्ठानतर्फे छायाचित्र प्रदशर्नाचे उद्घाटन
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि.4 - छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनामुळे नंदुरबारची ओळख संपूर्ण राज्यात होणार आहे. छायाचित्रकारांना समाजात मानाचे स्थान आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी यांनी केले. ज्येष्ठ छायाचित्रकार रामभाऊ पाटील प्रतिष्ठानतर्फे शहरात आयोजित राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होत़े
यावेळी हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ.रवींद्र चौधरी, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ.पीतांबर सरोदे, उद्योजक मदनलाल जैन, एलआयसीचे विकास अधिकारी हिरालाल महाजन, सुरेश पाटील, अरुण पाटील, भरत पाटील, व्यावसायिक छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष मानसिंग राजपूत उपस्थित होते.
राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त भामिनी महाले, प्राचार्या नूतनवर्षा वळवी यांचा जिल्हाधिका:यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शहरातील विभारे बिल्डिंग, शहर पोलीस ठाण्याजवळ येथे हे प्रदर्शन 5 जुलैर्पयत सुरू राहणार आह़े