पुरुषोत्तम वक्तृत्व स्पर्धेत राजश्री कुळकर्णी प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 12:30 IST2019-09-20T12:27:34+5:302019-09-20T12:30:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : स्व.पी.के. अण्णा पाटील स्मृतीदिनानिमित्त घेण्यात आलेल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत राजश्री ...

पुरुषोत्तम वक्तृत्व स्पर्धेत राजश्री कुळकर्णी प्रथम
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : स्व.पी.के. अण्णा पाटील स्मृतीदिनानिमित्त घेण्यात आलेल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत राजश्री कुळकर्णी हिने प्रथम तर प्रसाद जगताप याने द्वितीय क्रमांक पटकावला.
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ व श्री.पी.के. अण्णा पाटील फाऊंडेशनतर्फे स्व.पी.के. अण्णा पाटील स्मृतीदिनानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात येऊन निवड झालेल्या स्पर्धकांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत प्रथम बक्षीस दहा हजार रुपये रोख राजश्री जयंता कुलकर्णी (कृषी महाविद्यालय शहादा), द्वितीय बक्षीस सात हजार रुपये रोख प्रसाद देविसिंग जगताप (विद्यावर्धिनी महाविद्यालय धुळे), तृतीय बक्षीस पाच हजार रुपये रोख प्राजक्ता सुधाकर पिंगळे (फार्मसी कॉलेज नगांव), उत्तेजनार्थ प्रत्येकी एक हजार रुपये रोख अन्सारी सीमा साजीद (शहादा तालुका को-ऑप. एज्युकेशन सोसायटीचे विज्ञान महाविद्यालय शहादा) व सारांश धनंजय सोनार (डॉ.आंबेडकर विधी महाविद्यालय धुळे) या सर्व विद्याथ्र्याना फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते बक्षिसांचे वाटप करण्यात आले. यावेळी कमलताई पाटील, परीक्षक प्रा.चारुलता गोखले व प्रा.सतीश मोरे, माजी प्राचार्य डॉ.विश्वास पाटील आदी उपस्थित होते.