राजमोही शाळेतून टीव्ही लांबवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 12:24 IST2019-09-23T12:24:20+5:302019-09-23T12:24:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील राजमोही येथील जिल्हा परिषद शाळेतून चोरटय़ांनी 40 हजाराचा टीव्ही चोरुन नेला़ शनिवारी ...

Rajmohi removed the TV from school | राजमोही शाळेतून टीव्ही लांबवला

राजमोही शाळेतून टीव्ही लांबवला

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील राजमोही येथील जिल्हा परिषद शाळेतून चोरटय़ांनी 40 हजाराचा टीव्ही चोरुन नेला़ शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला़ 
जिल्हा परिषद मराठी शाळेच्या डिजीटल वर्गात 40 हजार रुपये किमतीचा टीव्ही लावण्यात आला होता़ शनिवारी शिक्षक जावेद कासम शेख हे शाळेत आले असता त्यांना टीव्ही चोरीला गेल्याचे दिसून आल़े घटनेमुळे एकच खळबळ उडाली आह़े  याबाबत शिक्षक शेख यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े  तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक बडगुजर करत आहेत़ 
 

Web Title: Rajmohi removed the TV from school