सारंगखेडा परिसरात पावसामुळे घरांची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 11:26 IST2019-09-13T11:26:23+5:302019-09-13T11:26:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा व परिसरात गेल्या दोन दिवसापासून संततधार सुरू आहे. यामुळे अनेक घरांची ...

सारंगखेडा परिसरात पावसामुळे घरांची पडझड
लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा व परिसरात गेल्या दोन दिवसापासून संततधार सुरू आहे. यामुळे अनेक घरांची पडझड होवून घरांना गळती लागली आहे.
सारंगखेडा व परिसरात दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने अनेक घरांना गळती लागली आहे व घरेही कोसळू लागले आहेत. यात सारंगखेडा व परिसरातील घरे कोसळू लागली आहेत. तर पक्की घरेदेखील पाझरू लागली आहेत. दरम्यान या पावसामुळे कापूस पिकालाही मोठा फटका बसत आहे.
परिसरातील सारंगखेडा, कु:हावद, पुसनद, बिलाडी, बामखेडा, कळंबू आदी सपाटीवरील भागातील शेतशिवारात कापूस, मका, मूग, सोयाबीन, बाजारा आदी पिके पाण्याखाली असल्याने ती पिके जास्त पाण्यामुळे पूर्णत: वाया जाण्याची परिस्थिती दिसून येत आहे. त्याचबरोबर मुलाची तोडणी करण्यासंदर्भात शेतक:यांना पावसाचा मोठा व्यत्यय येत आहे. मुगाच्या शेंगा जास्त पाण्याने फुगून वाया जात आहे. शेतक:यांच्या तोंडाचा घासच निसर्ग जणू हिरावतो आहे, अशी स्थिती आहे. उन्हाळी कापसाची बोंडे बुरशी लागून वाया जात आहेत.
या संततधार पावसाने सारंगखेडा व परिसरातील घरे कोसळू लागले आहेत. अनेक घरांना गळती लागली असून, रात्री झालेल्या पावसात सारंगखेडा येथील एका घराच्या मागील भाग पूर्णत: कोसळला. यात शौचालय व स्वच्छता गृहाचेही नुकसान झाले. त्याचप्रमाणे इतर सामानही यात दाबल्या गेल्याचे नुकसान झाले आहे. या पावसाने नालेही वाहत आहेत. परिसरातील लहान मोठे पाझर तलावही पूर्णपणे ओव्हरफ्लो झाले असून, सारंगखेडा बॅरेजचे पाच गेट उघडले असल्याने तापी नीदही दुथडी भरून वाहत आहे. या पावसामुळे पक्की घरेही पाझरायला लागली आहेत.