नंदुरबार जिल्ह्यात पावसाची रिपरिप; वीज पडून युवतीचा मृत्यू
By मनोज शेलार | Updated: November 26, 2023 17:17 IST2023-11-26T17:17:22+5:302023-11-26T17:17:28+5:30
जिल्ह्यात पहाटेपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी पावसाला सुरुवात झाली. दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती.

नंदुरबार जिल्ह्यात पावसाची रिपरिप; वीज पडून युवतीचा मृत्यू
नंदुरबार : जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असताना दुपारी शहादा तालुक्यातील जावदा तर्फे बोरद येथे शेतात काम करीत असलेल्या युवतीच्या अंगावर वीज पडून तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सपना राजेंद्र ठाकरे (वय १८, रा. जावदा तर्फे बोरद) असे मयत युवतीचे नाव आहे.
जिल्ह्यात पहाटेपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी पावसाला सुरुवात झाली. दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. ढगांच्या गडगडाटात सुरू असलेल्या पावसामुळे जावदा तर्फे बोरद परिसरात वीज पडली. शेतात काम करणारी सपना ठाकरे या युवतीच्या अंगावर वीज पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. याबाबत शहादा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तहसीलदार दीपक गिरासे यांनी जावदा येथे घटनास्थळी भेट दिली. पालकमंत्री अनिल पाटील यांनी तहसीलदारांशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली.