लोणखेडा परिसरात पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:33 IST2021-08-22T04:33:24+5:302021-08-22T04:33:24+5:30
परिसरात १७ ऑगस्ट रोजी प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर परिसरात पावसाचे आगमन झाले आहे. तब्बल तीन आठवडे पावसाने दडी मारली होती. तशातच ...

लोणखेडा परिसरात पाऊस
परिसरात १७ ऑगस्ट रोजी प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर परिसरात पावसाचे आगमन झाले आहे. तब्बल तीन आठवडे पावसाने दडी मारली होती. तशातच उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पिके करपू लागली होती. जलसिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देणे सुरू केले होते. फवारणी पंप व घागरीच्या सहाय्याने पाणी देऊन पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू होती. १७ ऑगस्ट रोजी आलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यानंतर जोरदार पावसाची सर्वांना प्रतीक्षा होती. शनिवारी दुपारी दोन वाजेपासून पाऊस सुरू होता. संपूर्ण आकाश ढगांनी आच्छादलेले होते. यावरून जोरदार पावसाची चिन्हे असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. पावसाळा सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला असून, नदी-नाल्यांना अद्यापही पूर आलेला नाही. जोरदार पाऊस व्हावा, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जात आहे.