पाऊस आला धावून पण पाणी जाते वाहून; रोझवा प्रकल्पाची स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 12:23 IST2019-11-14T12:23:17+5:302019-11-14T12:23:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : तळोदा तालुक्यातील रोझवा लघुप्रकल्पातून यंदाही अहोरात्र हजारो लिटर पाणी सांडव्याच्या भिंतीमधून वाहून जात असल्याने ...

पाऊस आला धावून पण पाणी जाते वाहून; रोझवा प्रकल्पाची स्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
रांझणी : तळोदा तालुक्यातील रोझवा लघुप्रकल्पातून यंदाही अहोरात्र हजारो लिटर पाणी सांडव्याच्या भिंतीमधून वाहून जात असल्याने परिसरातील शेतकरींकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, संबंधीत विभागाच्या भोंगळ कारभाराबद्दल कारवाई करण्याची मागणी होत आहे.
रोझवा लघुप्रकल्पाला गेल्या तीन ते चार वर्षापासून लागलेली गळती शेतक:यांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरली असून, याबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्तही प्रकाशित केले होते. परंतु सांडपाण्याची दुरूस्ती न झाल्याने पाण्याची गळती सुरूच असून, ओव्हर फ्लो झालेला लघुप्रकल्प झपाटय़ाने खाली होत आहे.
गेल्यावर्षी कमी पजर्न्यमान झाल्यामुळे रब्बी पीक घेणे शेतक:यांना शक्य झाले नव्हते. यावर्षी चांगला पाऊस होऊनही लघु प्रकल्प ओव्हरफ्लो होऊनही झपाटय़ाने खाली होत असल्याने उन्हाळ्यार्पयत लघुप्रकल्प रिकामा होतो की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता तरी संबंधीत विभागाला जाग येईल का? असा संतप्त प्रतिक्रिया शेतक:यांकडून येत आहे.