नंदुरबारातील रेल्वे बोगद्याचे काम दोन महिन्यात पूर्ण होणार : राजेंद्र फडके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:34 IST2021-09-05T04:34:04+5:302021-09-05T04:34:04+5:30

या समितीचे सदस्य राजेंद्र फडके, कैलास वर्मा, छोटू पाटील, गिरीश राजगोर, परशुराम महातो हे या समितीत होते. खासदार डॅा. ...

Railway tunnel work in Nandurbar to be completed in two months: Rajendra Phadke | नंदुरबारातील रेल्वे बोगद्याचे काम दोन महिन्यात पूर्ण होणार : राजेंद्र फडके

नंदुरबारातील रेल्वे बोगद्याचे काम दोन महिन्यात पूर्ण होणार : राजेंद्र फडके

या समितीचे सदस्य राजेंद्र फडके, कैलास वर्मा, छोटू पाटील, गिरीश राजगोर, परशुराम महातो हे या समितीत होते. खासदार डॅा. हीना गावीत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, माजी आमदार शिरीष चौधरी, सविता जयस्वाल यांच्यासह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते

यावेळी डॉ. राजेंद्र फडके यांनी रेल्वेस्थानक परिसरात असलेल्या अडचणी तसेच समस्या प्रवाशांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याबाबत अधिकाऱ्यांना ताकीद दिली. रेल्वेत होणारी गुन्हेगारी व अवैधरीत्या होणारी दारू वाहतूक बंद करावी या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश दिले. नंदुरबार शहरातील बोगद्याचे काम २०१८ पासून काम सुरू असून ते तांत्रिक अडचणीमुळे रखडले होते. दोन महिन्यांत हे काम पूर्ण होणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून वदवून घेतले. रेल्वे ट्रॅकवर यापूर्वी जनावरं मेली आहे, त्यामुळे बेरिगेडिंग लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात नियोजन करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या.

यावेळी समितीच्या सदस्य व अधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानक व परिसराची पाहणी केली. त्यानंतर अधिकारी पदाधिकारी व प्रवासी तसेच विविध संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. समस्या तक्रारी ऐकून घेतल्या तसेच निवेदन देखील घेतले. विविध नवीन गाड्या सुरू करणे तसेच रेल्वे स्थानकावरील समस्या अडचणी संदर्भात चर्चा झाली.

यावेळी स्टेशन मास्तर निहाल अहमद, आयपीएफ विजयकुमार पांडे , डी. एस. पांडे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व विविध संघटनांचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

Web Title: Railway tunnel work in Nandurbar to be completed in two months: Rajendra Phadke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.