जुगार अड्डयावर धाड, १३ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 12:39 IST2020-08-01T12:39:06+5:302020-08-01T12:39:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबारातील वाघोदा कुंभारवाडा येथे सुरू असलेल्या जुगार अड्डयांवर धाड टाकून पोलिसांनी दोन लाख २७ ...

Raid on gambling den, crime against 13 people | जुगार अड्डयावर धाड, १३ जणांवर गुन्हा

जुगार अड्डयावर धाड, १३ जणांवर गुन्हा


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबारातील वाघोदा कुंभारवाडा येथे सुरू असलेल्या जुगार अड्डयांवर धाड टाकून पोलिसांनी दोन लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी १३ जणांविरुद्ध उपनगर व शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबारातील कुंभारवाडा येथे सोनू कुंभार यांच्या घराच्या बाजुला जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली असता त्या ठिकाणी आठ जण जुगार खेळतांना मिळून आले. पोलिसांनी २० हजार ७१० रुपये जप्त केले.
शिवाय हिंमत धनसिंग परदेशी, हितेश राजेंद्र कुंभार, हेमंत रमेश कुंभार, संदीप मधुकर कुंभार, सचिन एकनाथ कुंभार, बबलू अशोक कुंभार, चंद्रकांत भिका कुंभार, सोनू लकडू कुंभार सर्व रा.कुंभारवाडा यांच्याविरुद्ध पोलीस कर्मचारी प्रफुल्ल अहिरराव यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई वाघोदा शिवारातील एका घरात करण्यात आली. वाघोदा शिवारातील एका बंद घरात जुगार सुरू असल्याची माहिती उपनगर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली असता तेथे पाच जण जुगार खेळतांना आढळून आले. त्यांच्याकडून एुकण दोन लाख सहा हजार ३०० रुपयांची रोख रक्कम व जुगाराची साधने आणि तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या.
पोलीस कर्मचारी सुनील येलवे यांनी फिर्याद दिल्याने विजय नरेश म्हस्के, सचिन जगन चांडे, गोलू श्रावण मोरे, चेतन विठ्ठल सूळ, भूषण भास्कर कुवर सर्व रा.नंदुरबार यांच्याविरुद्ध उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार बागल करीत आहे.

Web Title: Raid on gambling den, crime against 13 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.