सातपुडय़ातील भराडीपादर-खाई रस्त्यावर दरड कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 12:03 IST2019-09-29T12:02:59+5:302019-09-29T12:03:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : सातपुडय़ाच्या दुर्गम भागातील भराडीपादर ते खाई रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. सुदैवाने ...

A raid collapsed on the Bharadipadar-Khai road in Satpudia | सातपुडय़ातील भराडीपादर-खाई रस्त्यावर दरड कोसळली

सातपुडय़ातील भराडीपादर-खाई रस्त्यावर दरड कोसळली

लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : सातपुडय़ाच्या दुर्गम भागातील भराडीपादर ते खाई रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. दरम्यान, यामुळे या भागातील संपर्क तुटला आहे. वारंवार अशा प्रकारच्या घटना या भागात घडत आहेत. 
अक्कलकुवा तालुक्यातील गोरजाबारीमार्गे भराडीपादर ते खाई या रस्त्यावर वेळोवेळी दरड कोसळत आहे. रस्ता मोकळा केला जात असतानाच पुन्हा पुन्हा दरड कोसळ्यामुळे रस्ता बंद पडला आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. 
या रस्त्यावरून आता केवळ त्यावरुन केवळ दुचाकीच निघू शकते, अशा परिस्थितीमुळे हा रस्ता वाहतुकीला धोक्याचा ठरत आहे. मोठय़ा वाहनधारकांना फेरा मारून कुवा व भराडीपादर या मार्गाने भराडीपादर, रायसिंगपूरमार्गे खापर, अक्कलकुवार्पयत पोहोचावे लागत आहे. 
सततच्या पावसामुळे घाट  सेक्शन च्या भाग असलेल्या   रस्त्यावर डोंगरावरून दरड कोसळण्याचे सुरूच असुन अक्कलकुवा तालुक्यातील भराडीपादर गोरजाबारी खाई या रस्त्यावर चार पाच   ठिकाणी दरड व मातीच्या मलबा कोसळून पडल्याने रस्ता पूर्ण बंद  पडला आहे. त्यामुळे खाई, गोरजाबारी, ओहवा, सरपंचपाडा खाई या गाव पाड्यांवरील वाहनधारकांना फेरा मारून कुवा भराडीपादर या मार्गाने  परत भराडीपादर रायसिगपुर करत खापर, अक्कलकुवा गाठावे लागत असुन त्यामुळे वाहनधारकांना त्रासदायक झाले आहे. या रस्त्यावर पडणारे दरड व मातीच्या मलबा वेळेवर काढला जात नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे या भागातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 
 

Web Title: A raid collapsed on the Bharadipadar-Khai road in Satpudia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.