पाणी पुनर्भरणासाठी ‘राहुरी पॅटर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 20:32 IST2019-04-25T20:31:53+5:302019-04-25T20:32:13+5:30

मोहिम : कोळदा कृषी विज्ञान केंद्राकडून गावोगावी होतेय शेतकऱ्यांचे प्रबोधन

'Rahuri Pattern' for water rehabilitation | पाणी पुनर्भरणासाठी ‘राहुरी पॅटर्न’

पाणी पुनर्भरणासाठी ‘राहुरी पॅटर्न’

नंदुरबार : गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी झालेले पर्जन्यमान, वाढत्या तापमानामुळे भूजल पातळीत झालेली घट या पार्श्वभूमिवर येत्या पावसाळ्यात भूजल पातळी वाढविण्यासाठी नंदुरबारात सध्या ‘राहुरी पॅटर्न’चा वापर करण्यात येत आहे़
कोळदा ता़ नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे सध्या गावोगावी फिरुन पाणी पुनर्भरणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत़ या माध्यमातून वर्षानुवर्षे बंद पडलेल्या कुंपनलिका कशा प्रकारे पुन्हा कार्यान्वित होऊ शकतात याचे मार्गदर्शन व प्रात्याक्षिक शेतकºयांसमोर सादर करण्यात येत आहे़ राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील भूजल सर्वेक्षण विभागाकडून तयार करण्यात आलेल्या मॉडेलनुसार नंदुरबारात पाणी पुनर्भरण मोहिम राबविण्यात येत आहे़ यांतर्गत ब्राह्मणपुरी ता़ शहादा येथे २५ ठिकाणी तसेच न्याहली, शिंदे, कोळदे, समशेरपूर, लहान शहादे आदी ठिकाणीही या मॉडेलनुसार पाणी पुनर्भरणचे काम करण्यात आले आहे़ या शिवाय जिल्ह्यात विविध ठिकाणी याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे़ जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात भूजल पातळीत घट होताना दिसून येत आहे़ पावसाचे पाणी वाहून जात असल्याने वर्षानुवर्षे लाखो लीटर पाण्याची केवळ वाहून गेल्याने नासडी होत असते़ त्यामुळे साहजिकच भूजल पातळीदेखील वाढत नसून दिवसेंदिवस त्यात घटच होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे़ त्यामुळे कोळदा कृषी विज्ञान केंद्राकडून राहुरी विद्यापीठाच्या भूजल सर्वेक्षण विभागाच्या पॅटर्ननुसार जिल्ह्यातील शेतकºयांना याचा कसा लाभ मिळू शकेल याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे़

Web Title: 'Rahuri Pattern' for water rehabilitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.