जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 12:58 PM2020-03-28T12:58:43+5:302020-03-28T12:58:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संचारबंदीमुळे उद्भवलेल्या समस्यांचा समाना करीत असतांनाच जिल्ह्यात अवकाळी पाऊस देखील झाला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ...

Rabi crops damaged due to untimely rains in the district | जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : संचारबंदीमुळे उद्भवलेल्या समस्यांचा समाना करीत असतांनाच जिल्ह्यात अवकाळी पाऊस देखील झाला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये मोठी भर पडली आहे.
कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात सुरु विविध उपाययोजना करण्यात येत आहे. या उपाययोजनांचाच एक भाग असलेल्या संचारबंदीत सर्वच घटक अडले आहे, त्यातून शेतकरीही सुटला नाही. वाहतुक बंद झाल्याने शेतमाल पडून आहे. बहुतांश पिके शेतातच खराब होत आहे. अशा समस्यांशी शेतकरी या दोन हात करीत असतानाच पुन्हा अवकाळी पाऊस देखील झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये दुपटीने भर पडली आहे.
नंदुरबार तालुक्यातील शहादा शहादे व कोपर्ली भागात गहू पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकºयांचे गव्हाचे पिक काढणीचा कालावधी आला आहे.त. परंतु सर्वत्र संचारबंदी असल्यामुळे गहू कापणीसाठी कुठलाही हार्वेस्टर मालक पुढे धजावत नाही. परिणामी पिके शेतातच आहे. असे असतांनाच अवकाळी पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.
पपई उत्पादकांची देखील हीच परिस्थिती आहे. संचारबंदीमुळे पपई खरेदीसाठी व्यापरी येत नाही. पपईची तोडणीच झाली नसल्यामुळे बहुतांश शेतकºयाची पपई परिपक्वहोऊन झाडावरच पिकली, काही पपई खराब देखील झल्या. अशी समस्या असतानाच पुन्हा अवकाळी पाऊस झाला, या पावसाने अन्य पपईच्या बागाही व्यापल्या असून फळे खराब होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी काही नियम शिथील करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Rabi crops damaged due to untimely rains in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.