रब्बीचे क्षेत्र यंदा 25 टक्क्यांनी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 11:55 AM2019-11-19T11:55:13+5:302019-11-19T11:55:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यात यंदा जवळपास दहा हजार हेक्टरपेक्षा अधीक क्षेत्रावर रब्बीची पेरणी होणार आहे. त्यादृष्टीने कृषी ...

Rabbi area will grow by 25 percent this year | रब्बीचे क्षेत्र यंदा 25 टक्क्यांनी वाढणार

रब्बीचे क्षेत्र यंदा 25 टक्क्यांनी वाढणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  जिल्ह्यात यंदा जवळपास दहा हजार हेक्टरपेक्षा अधीक क्षेत्रावर रब्बीची पेरणी होणार आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे. आवश्यक बियाण्यांची व खतांची उपलब्धतेच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, यंदा गहू पिकाचे क्षेत्र 20 ते 25 टक्क्यांनी वाढणार आहे. 
गेल्या तीन ते चार वर्षापासून पाण्याअभावी रब्बी हंगामात निम्मे उत्पादनही मिळत नसल्याचे चित्र होते. त्यामुळे शेतक:यांचे आर्थिक गणित कोलमडले होते. गेल्या वर्षी तर दुष्काळामुळे पिण्यासाठी पाणी नसतांना शेतीसाठी पाणी आणणार कुठून हा प्रश्न होता. त्यामुळे गेल्या वर्षी रब्बी हंगाम देखील वाया गेला होता. मुख्य पीक असलेले गहू आणि हरभराचे उत्पादन निम्मे देखील आले नव्हते. यंदा मात्र, परिस्थिती वेगळी आहे. अतिवृष्टीमुळे आणि तब्बल 140 टक्के पावसामुळे अद्यापही नदी, नाले वाहत आहे. लहान, मोठे प्रकल्प आणि बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत. यामुळे यंदा रब्बी हंगामासाठी पाण्याची चिंता नसल्यामुळे रब्बीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होण्याची अपेक्षा शेतक:यांना आहे. परिणामी रब्बीचे क्षेत्र 20 ते 25 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता देखील कृषी विभागाने व्यक्त केली आहे. 
731.57 हेक्टर क्षेत्र
जिल्ह्यात रब्बी व उन्हाळी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र 731.57 हेक्टर इतके आहे. त्यापैकी जवळपा 491.56 हेक्टर क्षेत्रात रब्बीची पेरणी होत असते. यंदा मात्र सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा अधीक क्षेत्रावर पेरणीचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी आणि नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात झालेल्या पावसामुळे शेतांमध्ये अजूनही ओल कायम आहे. ब:याच शेतांमध्ये अजूनही पाणी साचलेले आहे. यामुळे रब्बीसाठी ही बाब दिलासादायक तेव्हढीच मदतीची देखील ठरणार आहे. अनेक शेतक:यांच्या शेतातील कुपनलिका, विहिरी या तुडूंब भरल्या आहेत. त्यामुळे रब्बी हंगामाला ते पोषक ठरणार आहे.
विविध पिकांचे क्षेत्र 
जिल्ह्यात रब्बीच्या सर्वसाधारण क्षेत्रापैकी विविध पिकांचे क्षेत्र साधारणत: पुढील प्रमाणे आहे. ज्वारी 160.33 हेक्टर, गहू 211.23 हेक्टर, मका 33.82 हेक्टर, इतर तृणधान्य 1.93 हेक्टर, हरभरा 204.5 हेक्टर, इतर कडधान्य 10.34 हेक्टर, करडई 1.67 हेक्टर, सूर्यफूल 0.88 हेक्टर असे सर्वसाधारण रब्बी पिकांचे क्षेत्र जिल्ह्यात आहे. 
गहू, हरभरा वाढणार..
यंदा गहू व हरभरा पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र हे वाढणार आहे. गहूचे एक ते दीड पट तर हरभराचे देखील क्षेत्र ब:यापैकी वाढणार आहे. या दोन्ही पिकांना थंडीची आवश्यकता असते यंदा हवामान खात्याच्या अंदाजानुसार थंडीचे प्रमाण देखील सर्वधारणपेक्षा अधीक राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच दृष्टीने यंदा रब्बीसाठी पोषक वातावरण राहणार आहे. 
खतांचीही उपलब्धता
रब्बी हंगामासाठी रासायनिक खतांची देखील आवश्यक ती उपलब्धता करून देण्यात आली आहे.  रब्बी हंगामासाठी सर्वसाधरणत: 70 ते 75 मे.टन रासायनिक खतांची उपलब्धता लागते. तेव्हढी मागणी कृषी विभागातर्फे कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 72.563 मे.टन खत मागणी करण्यात आली होती. तेवढी उपलब्ध झाली होती. परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे त्यातील निम्मेच खत शेतक:यांनी उचलले होते. 

रब्बीसह अनेक शेतकरी उन्हाळी हंगाम देखील घेत असतात. यंदा रब्बी प्रमाणेच उन्हाळी हंगामही चांगला राहण्याची शक्यता आहे. जमिनीतील वाढलेली पाण्याची पातळी आणि विहिर व कुपनलिकांना असलेले पाणी यामुळे उन्हाळी भुईमूग, बाजरी व इतर पिकांची स्थिती व क्षेत्र यंदा चांगले वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली.
 

Web Title: Rabbi area will grow by 25 percent this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.