रोखीच्या व्यवहारांवर जलद प्रतिसाद पथकाची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 12:03 IST2019-03-17T12:02:57+5:302019-03-17T12:03:12+5:30
नंदुरबार : लोकसभा निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर रोख रक्कम किंवा वस्तुंचे हस्तांतरण होऊ नये यासाठी जलद प्रतिसाद पथकामार्फत ...

रोखीच्या व्यवहारांवर जलद प्रतिसाद पथकाची नजर
नंदुरबार : लोकसभा निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर रोख रक्कम किंवा वस्तुंचे हस्तांतरण होऊ नये यासाठी जलद प्रतिसाद पथकामार्फत विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
या पथकासाठी सहाय्यक संचालक आयकर विभाग मालेगाव यांचेकडून समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक २४ तास कार्यरत राहणार असून, यात अन्य पाच सदस्य आणि पोलीस कर्मचारी असतील. पथक २४ तास गैरमार्गाने होणाऱ्या वस्तु किंवा रोख रखमेच्या हस्तांतरणावर लक्ष देणार आहे.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान होणाºया गैरप्रकाराबाबत कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनीदेखील असे प्रकार आढळल्यास आचारसंहिता कक्षाकडे माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी मंजुळे यांनी केले आहे.