लसीकरणासाठी रांगा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:19 IST2021-07-12T04:19:57+5:302021-07-12T04:19:57+5:30
नंदुरबार : शहरातील विविध लसीकरण केंद्रात नागरिकांच्या रांगा कायम आहेत. पहिला व दुसरा डोस घेण्यासाठी या रांगा लागत असून ...

लसीकरणासाठी रांगा कायम
नंदुरबार : शहरातील विविध लसीकरण केंद्रात नागरिकांच्या रांगा कायम आहेत. पहिला व दुसरा डोस घेण्यासाठी या रांगा लागत असून काही ठिकाणी सोय तर काही ठिकाणी गैरसोयींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
१८ वर्षावरील सर्वांनाच लसीकरण केले जात असल्यामुळे लसीकरण केंद्रांवर रांगा लागत आहेत. त्यातच मध्यंतरी लस उपलब्ध नसल्याने केंद्र बंद ठेवावे लागले होते. आता पुरेसे डोस उपलब्ध असल्याने लसीकरण वेगात आहे. त्यामुळे केंद्राबाहेर रांगा लागत आहेत.
नंदुरबारातील नाट्यगृहाच्या केंद्रात रांगेतील नागरिकांसाठी खुर्चींची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे ते सोयीचे ठरत आहे. तर काही केंद्रांवर जागेअभावी नागरिकांना रांगेत उभेच राहावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यातच पाऊस आल्यास मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र आहे.