लॉकडाऊनमध्ये खतांसाठी रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 12:43 IST2020-07-28T12:43:37+5:302020-07-28T12:43:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमध्ये खतांच्या दुकानांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे सोमवारी खते घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या. ...

लॉकडाऊनमध्ये खतांसाठी रांगा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॉकडाऊनमध्ये खतांच्या दुकानांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे सोमवारी खते घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या.
गेल्या आठवड्यात कडक लॉकडाऊन लागू होता. त्यामुळे ग्रामिण भागातून कुणी येऊ शकत नव्हते. मात्र, खते घेण्यासाठी मुभा मिळाल्याने सोमवारी मोठ्या संख्येने शेतकरी दाखल झाले. त्यामुळे कृषी निविष्ठा केंद्रांवर खते घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. दुपारपर्यंत ही स्थिती कायम होती.