शहाद्यातील सिटी स्कॅन सेंटरवर रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:29 IST2021-04-10T04:29:52+5:302021-04-10T04:29:52+5:30

कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर, रुग्णांना कोरोनाचा संसर्ग फुप्फुसात किती झाला आहे, हे पाहण्यासाठी छातीचे सिटी स्कॅन केले जाते. त्यासाठी ...

Queues at the City Scan Center in Shahada | शहाद्यातील सिटी स्कॅन सेंटरवर रांगा

शहाद्यातील सिटी स्कॅन सेंटरवर रांगा

कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर, रुग्णांना कोरोनाचा संसर्ग फुप्फुसात किती झाला आहे, हे पाहण्यासाठी छातीचे सिटी स्कॅन केले जाते. त्यासाठी शहरात दोन खासगी सिटी स्कॅन केंद्र कार्यान्वित आहेत. पैकी सुश्रुत नर्सिंग होम येथील सिटी स्कॅन सेंटर तांत्रिक बाबींमुळे सध्या बंद असल्याने शहरात एकच केंद्र सुरू आहे. दररोज रुग्णांची वाढती संख्या पाहता, या केंद्रावर चाचणी करण्यासाठी लांबच लांब रांग लागत आहे. त्यामुळे तासन्‌तास चाचणी करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. काही रुग्ण मात्र दोंडाईचा व नंदुरबारकडे धाव घेत आहेत.

आवश्यकता भासल्यास चाचणी करा

कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्ण कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत, तर काही रुग्ण घरीच क्वारंटाइन होऊन औषधोपचार करीत आहेत. ॲडमिट रुग्णांना गरज भासल्यास डॉक्टर एचआरसीटी चाचणी करण्यासाठी पाठवतात, परंतु काही रुग्ण मात्र घाबरून पहिलेच चाचणी करण्यासाठी धाव घेत असल्याने केंद्रावर गर्दी होत आहे. त्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानेच चाचणी करणे गरजेचे आहे, परंतु तसे न होता, ऐकीव माहितीनुसार लोकांची चाचणीसाठी झुंबड उडत आहे.

Web Title: Queues at the City Scan Center in Shahada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.