The question of the waters of Ukai should be resolved soon | उकईच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार
उकईच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेल्या तापी नदीवरील उकई धरणाच्या पाच टीएमसी पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून देहली प्रकल्पग्रस्तांना 19 कोटी रुपयांच्या निधीसाठी येत्या कॅबीनेट बैठकीत मान्यता घेतली जाणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. लोकसंघर्ष मोर्चातर्फे या प्रश्नावर मुंबईत नुकतीच बैठक झाली. 
जलसंपदा मंत्री  गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतखाली झालेल्या बैठकीत  लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जलसंपदा विभागाच्या सचिव, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा व डेप्युटी इंजिनिअर जोशी व इतर अधिकारी उपस्थित होते. 
महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री  गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतखाली झालेल्या बैठकीत  लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जलसंपदा विभागाच्या सचिव, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा व डेप्युटी इंजिनिअर जोशी व इतर अधिकारी उपस्थित होते. 
2015 मध्ये महाराष्ट्र व गुजरात सरकार मध्ये पाणी उचलण्याचा निर्णय झाला आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात 386 हेक्टर, तळोदा तालुक्यात 4,826 हेक्टर, नवापूर तालुक्यात 3,342 हेक्टर तर नंदुरबार तालुक्यात 15,146 हेक्टर म्हणजे एकुण 23, 700 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. याला एकुण खर्च 957.83 कोटी असून  लाभाचे  गुणोत्तर 1.124 येते. या योजनेतील करारात असलेली त्रुटी दूर करण्यासाठी जलसंपदा मंत्री स्वत: गुजरात सरकारशी बोलणी करून लगेच कॅबिनेट मधे ठेवून तापीतून पाणी उचलण्याच्या प्रक्रियेला वेग देणार आहेत. देहली प्रकल्पातून जवळ जवळ 3200 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.  जर तापी व देहली प्रकल्पांचे काम पुढे गेले तर नंदुरबार जिल्ह्यात जवळ जवळ 27 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे व अत्यल्प असणारे नंदुरबार जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. 


Web Title: The question of the waters of Ukai should be resolved soon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.