दुधाळे येथे आलेल्या २०० ऊसतोड मजुरांना केले क्वॉरंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 12:02 IST2020-05-02T12:02:03+5:302020-05-02T12:02:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लहान शहादा : गुजरातमध्ये ऊस तोडणीसाठी गेलेले मजूर परतु लागले आहेत. त्यामुळे गावागावात त्यांना सामावून घेण्यासाठी ...

 Quarantined 200 sugarcane workers who came to Dudhale | दुधाळे येथे आलेल्या २०० ऊसतोड मजुरांना केले क्वॉरंटाईन

दुधाळे येथे आलेल्या २०० ऊसतोड मजुरांना केले क्वॉरंटाईन


लोकमत न्यूज नेटवर्क
लहान शहादा : गुजरातमध्ये ऊस तोडणीसाठी गेलेले मजूर परतु लागले आहेत. त्यामुळे गावागावात त्यांना सामावून घेण्यासाठी आणि त्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी प्रशासनाची कसरत होत आहे.
गुरुवारी सकाळी दुधाळे, ता.नंदुरबार येथे देखील सुमारे २०० मजूर आले. गावात मजूर आल्याची माहिती मिळताच तातडीने जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आले. त्यानंतर आरोग्य पथक गावात दाखल झाले. यावेळी संबधित सर्व मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कुठल्याही मजुरालाक कोरोना संदर्भातील काहीही लक्षणे आढळून आली नाहीत. त्यामुळे त्यांना लागलीच होम क्वॉरंटाईन करण्यात आले. क्वॉरंटाईन दरम्यान मजुरांनी घराबाहेर निघू नये अशा सुचना देखील आरोग्य कर्मचाऱ्यांनी यावेळी सर्व मजुरांना दिल्या.
शिक्का कसला याबाबत मजुरांमध्ये उत्सूकता होती. दाखल झालेल्या सर्व मजुरांची लागलीच आरोग्य तपासणीनंतर त्यांना होम क्वॉरंटाईनचा शिक्का त्यांच्या हातावर मारण्यात आला. परंतु शिक्का कसला म्हणून ते अचंबीत झाले. काहींनी नकार देखील दिला.

 

Web Title:  Quarantined 200 sugarcane workers who came to Dudhale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.