पुष्पदंतेश्वरचा झाला आयान शुगर कारखाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:34 IST2021-03-09T04:34:18+5:302021-03-09T04:34:18+5:30
नंदुरबार : तालुक्यातील पुष्पदंतेश्वर साखर कारखाना सात वर्षांपूर्वी खासगी कंपनीला विक्री झाल्यानंतर कारखाना सातत्याने सुरू आहे. सद्या या कारखान्याचा ...

पुष्पदंतेश्वरचा झाला आयान शुगर कारखाना
नंदुरबार : तालुक्यातील पुष्पदंतेश्वर साखर कारखाना सात वर्षांपूर्वी खासगी कंपनीला विक्री झाल्यानंतर कारखाना सातत्याने सुरू आहे. सद्या या कारखान्याचा विस्तार करून तो आठ हजार मे.टन प्रतिदिन गाळप क्षमतेचा करण्यात आला आहे. उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांचेही काम या ठिकाणी सुरू आहे.
संस्थापक चेअरमन मोहनभाई चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत पुष्पदंतेश्वर सहकारी साखर कारखान्याची १९९६ मध्ये निर्मिती केली होती. दहा ते बारा वर्ष कारखाना सुरू राहिल्यानंतर सात वर्षांपूर्वी आघाडी शासनाच्या काळात या कारखान्याची विक्री करण्यात आली. तत्कालीन ॲस्ट्रोरिया शुगर या कंपनीने कारखाना विकत घेतला. चार वर्ष याच बॅनरखाली कारखाना सुरू राहिल्यानंतर तीन वर्षांपूर्वी कंपनीचे नाव बदलून ते आयान शुगर करण्यात आले.
पूर्वी कारखाना केवळ साडेबाराशे मे.टन प्रतिदिन गाळप क्षमतेचा होता. नंतर तो अडीच हजार मे.टन करण्यात आला. कंपनीने विकत घेतल्यानंतर तो पाच हजार मे.टन झाला आता आणखी विस्तार करून तो आठ हजार मे.टन प्रतिदिन गाळप क्षमतेचा झाला आहे. कारखान्यात लवकरच उपपदार्थ निर्मिती प्रकल्प अर्थात डिस्टलरी व वीजनिर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याच्या सूत्रांनी दिली.