प्रकाशा येथे प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या आठ व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:31 IST2021-03-16T04:31:42+5:302021-03-16T04:31:42+5:30

प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या आठ व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी ५०० रुपयांप्रमाणे चार हजार रुपयांचा दंड ...

Punitive action against eight traders using plastic bags at Prakasha | प्रकाशा येथे प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या आठ व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई

प्रकाशा येथे प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या आठ व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई

प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या आठ व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी ५०० रुपयांप्रमाणे चार हजार रुपयांचा दंड वसूल करुन प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई ग्रामपंचायतीकडून सोमवारी करण्यात आली.

प्रकाशा येथे ‘माझी वसुंधरा’ उपक्रमांतर्गत पर्यावरण संरक्षणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याबाबत ग्रामपंचायतीकडून वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही काही दुकानदार प्लास्टिक पिशवी वापरत होते. यासाठी प्रकाशा ग्रामपंचायतीकडून सोमवारी मोहीम राबविण्यात आली. ज्या दुकानदारांकडे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या (कॅरी बॅग) आढळल्या, अशा आठ व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपयांप्रमाणे चार हजारांचा दंड वसूल करून प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला. या मोहिमेत ग्रामविकास अधिकारी बी. जी. पाटील, तलाठी धर्माराज चौधरी, पोलीस कर्मचारी रामा वळवी व ग्रामपंचायतीचे कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी व्यावसायिकांना प्लास्टिकचा वापरु नका, अशा सूचना देण्यात आल्या. या मोहिमेत सातत्य ठेवण्याची अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

Web Title: Punitive action against eight traders using plastic bags at Prakasha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.