दरने येथील तरुणाची हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या- जिल्हा राजपूत समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:36 IST2021-09-08T04:36:30+5:302021-09-08T04:36:30+5:30

नंदुरबार : शिंदखेडा तालुक्यातील दरने येथील तरूण हा पोळा सणाचे औचित्य साधत शोरूममधून नवीन मोटरसायकल घेऊन घरी जात असताना ...

Punish the person who killed the youth in Darane - District Rajput community's statement to the District Collector | दरने येथील तरुणाची हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या- जिल्हा राजपूत समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

दरने येथील तरुणाची हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या- जिल्हा राजपूत समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नंदुरबार : शिंदखेडा तालुक्यातील दरने येथील तरूण हा पोळा सणाचे औचित्य साधत शोरूममधून नवीन मोटरसायकल घेऊन घरी जात असताना अज्ञात नराधमांनी दरने ते चिमठाणा रस्त्यावर त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली. या घटनेतील संशयित नराधमांवर फास्टट्रॅकने खटला चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी, याबाबतचे निवेदन नंदुरबार जिल्हा राजपूत समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांंना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शिंदखेडा तालुक्यातील दरने येथील रहिवासी प्रेमसिंग राजेंद्र गिरासे (२१) हा तरुण घरातील एकुलता एक होता. घरची परिस्थिती बेताची असल्याने सर्वस्वी जबाबदारी त्याच्यावरच होती. प्रेमसिंग गिरासे हा तरुण पशुचिकित्सक म्हणून कार्य करीत होता. घरात सर्व व्यवस्थित सुरू असतानाच सणासुदीच्या दिवशी त्याच्यावर नराधमांनी दरने ते चिमठाणे रस्त्यावरील सबस्टेशन जवळ धारदार शस्त्राने वार करून त्यास जीवे ठार केले व त्याच्या नवी घेतलेल्या दुचाकीसह नराधमांनी पोबारा केला. हे कृत्य करणाऱ्यांचा राज्यातील संपूर्ण राजपूत समाजातर्फे निषेध व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, पृथ्वीराज रावल, विजय राजपूत, महेंद्र राजपूत, सुनील गिरासे, प्रदीप गिरासे, पृथ्वीराज चव्हाण, सुरेंद्र राजपूत, कृपाल राजपूत, गणेश राजपूत, हर्षल राजपूत, नितीन नागरे, धीरज राजपूत आदींसह समाजबांधव उपस्थित होते. निवेदनावर या सर्वांच्या सह्या आहेत.

Web Title: Punish the person who killed the youth in Darane - District Rajput community's statement to the District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.