कडधान्याची उत्पादकता ३० टक्क्यांनी घटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 11:36 IST2020-09-07T11:36:26+5:302020-09-07T11:36:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत पावसाची नोंद झाली आहे. परंतु आॅगस्टच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात संततधार ...

कडधान्याची उत्पादकता ३० टक्क्यांनी घटणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत पावसाची नोंद झाली आहे. परंतु आॅगस्टच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात संततधार पावसामुळे कडधान्य पिकाला मोठा फटका बसला आहे. उडीद, मूग, चवळी यासह सोयाबीन व काही प्रमाणात कापसाचा समावेश आहे. अती पावसामुळे ही पिके सडली, काही ठिकाणी पिवळी पडली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी यंदा पर्जन्यमान चांगले, पीक स्थिती चांगली असतांनाही या पिकांची उत्पादकता २५ ते ३० टक्के कमी होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात यंदा वेळेवर पाऊस झाला. मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने अनेक शेतकºयांनी कापूस लागवड केली होती. बागायतदार शेतकºयांनी देखील कडधान्य व तृणधान्याची पेरणी केली होती. परंतु मध्यंतरी पावसाने ताण दिल्याने आणि सरासरी इतका देखील पाऊस न झाल्याने पिकांची अवस्था वाईट झाली होती. शेतकºयांनी जेमतेम अर्थात पुर्ण जुलै महिना पीक वाचविण्याची धडपड केली. आॅगस्ट महिन्यात मात्र समाधानकारक पाऊस झाला. तिसºया व चौथ्या आठवड्यातील पावसाने मात्र पिकांवर परिणाम केल्याचे चित्र आहे.
तूट काढली भरून
आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाची तूट ही ३५ टक्केपर्यंत वाढली होती. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा देखील सरासरीचा ४० टक्के देखील झालेला नव्हता. विहिरी व कुपनलिकांच्या पाणी पातळीवर परिणाम झाला होता.
नदी, नाले कोरडेच होते. परंतु आॅगस्टच्या दुसºया आठवड्यापासून पावसाने बºयापैकी हजेरी लावली. तिसºया व चौथ्या आठवड्यात संततधार आणि मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाने दैना उडवून दिली. तूट देखील आॅगस्टच्या अखेर अवघी चार टक्क्यावर आली. जुलैच्या सुरुवातीपर्यंत तूट भरून निघाली आहे. आता सरासरीचा ९२ टक्केपर्यंत पावसाची नोंद झाली आहे.
पिकांना मात्र फटका
पावसाची तूट भरून निघाली असली तरी या संततधार पावसाने पिकांना मात्र फटका बसला. शेतातील पाण्याचा निचरा न होणे सतत ओलावा राहणे यामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. किडीचाही प्रादुर्भाव झाला. पिकं पिवळी पडली.
मूग, उडीद, चवळी व सोयाबीनचे पीक तर अनेक ठिकाणी सडले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याचे चित्र नंदुरबार तालुक्यातील पूर्व भाग, शहादा, तळोदा तालुक्यात दिसून आले. जी पिकं थोडीफार वाचली आहेत त्यांची उत्पादकता २५ ते ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. यामुळे शेतकºयांच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे.
प्रशासनाकडून दखल नाही
पावसामुळे खबार झालेली पिकं, झालेले नुकसान याबाबत मात्र प्रशासनाकडून दखल घेतली गेली नसल्याचे चित्र आहे. लोकप्रतिनिधींनी देखील याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे शेतकºयांमध्ये नाराजीची भावना आहे.
गेल्या वर्षी देखील सरासरीचा अधीक पाऊस झाला होता. पिकं परिपक्वहोण्याच्या कालावधीतच पावसाची संततधार कायम राहिल्याने नुकसान झाले होते.
यंदा देखील पाऊस सरासरी ओलांडणार अशी शक्यता आहे. पावसाचे आणखी तीन आठवडे शिल्लक आहे. परतीचा पाऊस हा मुसळधार स्वरूपाचा असतो. त्यामुळे पावसाच्या आकडेवारीत भर पडणार आहे.त्याचा फायदा मात्र रब्बी पिकाला होणार आहे.