ध्वनीक्षेपकावरील प्रचार यंदा शांत शांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 12:53 IST2019-10-12T12:53:38+5:302019-10-12T12:53:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : निवडणूक आयोगाचे बदललेले नियम, खर्चाची तजवीज यामुळे पूर्वीसारख्या रिक्षांवरील ध्वनीक्षेपकावरून प्रचाराला यंदा फाटा मिळालेला ...

ध्वनीक्षेपकावरील प्रचार यंदा शांत शांत
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : निवडणूक आयोगाचे बदललेले नियम, खर्चाची तजवीज यामुळे पूर्वीसारख्या रिक्षांवरील ध्वनीक्षेपकावरून प्रचाराला यंदा फाटा मिळालेला दिसत आहे. यामुळे सध्या परीक्षा आणि अभ्यासात व्यग्र असलेल्या विद्याथ्र्याना हायसे वाटत आहे.
निवडणुका म्हटल्या म्हणजे ध्वनीक्षेपक, रॅली, प्रचार फेरी, कोपरा सभा या बाबी आल्याच. त्यामुळे निवडणुकीच्या काळात वृद्ध, आजारी व्यक्ती आणि विद्याथ्र्याना त्याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. यंदा मात्र, निवडणुकीच्या रणधुमाळीतील हे चित्र अद्याप पाहिजे तसे दिसून येत नसल्यामुळे नागरिकांना सर्वत्र शांत शांत वाटत आहे. विशेष म्हणजे सध्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गाच्या परीक्षा सुरू आहेत. त्यातच निवडणुकांचीही धामधूम सुरू आहे. शिक्षकांना निवडणुकीच्या डय़ुटय़ा लागलेल्या आहेत. अशा वेळी कर्णकर्कश आवाजातील रिक्षांवरील प्रचार किंवा एलईडी स्क्रिनवरील प्रचाराला यंदा फाटा दिलेला दिसत असल्यामुळे विद्याथ्र्याच्या अभ्यासात फारसा व्यत्यय येत नसल्याचे चित्र आहे.
याला कारण निवडणूक आयोगाचे सक्त नियम, खर्च दाखविण्यासाठीची सक्ती, जाहीर प्रचारावर आयोगाची असलेली नजर हे कारणीभूत आहेत. असे असले तरी शेवटच्या टप्प्यात या बाबी प्रकर्षाने वाढतील अशी शक्यता आहे.