विसरवाडी येथे मंगळवार ते रविवारपर्यंत जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:31 IST2021-04-20T04:31:39+5:302021-04-20T04:31:39+5:30

यावेळी सरपंच बकाराम गावीत, पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाने, उद्योजक विजय अग्रवाल, जयेश अग्रवाल, धारासिंग गोसावी, सचिन तांबोळी, रवींद्र अग्रवाल, ...

Public curfew at Viserwadi from Tuesday to Sunday | विसरवाडी येथे मंगळवार ते रविवारपर्यंत जनता कर्फ्यू

विसरवाडी येथे मंगळवार ते रविवारपर्यंत जनता कर्फ्यू

यावेळी सरपंच बकाराम गावीत, पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाने, उद्योजक विजय अग्रवाल, जयेश अग्रवाल, धारासिंग गोसावी, सचिन तांबोळी, रवींद्र अग्रवाल, फारुख हवेलीवाला, अबीत शेख, दीपक सैंदाणे, योगेश तांबोळी, पंकज पवार, बबलू गावीत व व्यापारीवर्ग उपस्थित होते.

सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये संक्रमण वाढत चाललेले आहे. तसेच मृत्युदरही वाढत चाललाय. विसरवाडी येथे बाजारानिमित्त तसेच दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यांच्यात कोरोनाबाधित रुग्णदेखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विसरवाडी येथील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्या पार्श्वभूमीवर उपस्थित ग्रामस्थांनी विसरवाडी येथे मंगळवार दिनांक २७ पासून रविवार दिनांक २५ एप्रिलपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरवले.

यादरम्यान फक्त अत्यावश्यक सेवा, दवाखाने आणि मेडिकल हेच सुरू राहतील. किराणा दुकान व सर्व प्रकारची दुकाने पूर्णवेळ बंद राहतील, असा निर्णय घेण्यात आला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये, सामाजिक अंतर व मास्कचा जास्तीत जास्त वापर करावा, असे सरपंच बकाराम गावीत यांनी केले.

Web Title: Public curfew at Viserwadi from Tuesday to Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.