भरदुपारी दागिने चोरणाऱ्यास पब्लिक मार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 11:59 AM2020-06-02T11:59:28+5:302020-06-02T11:59:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील विरल विहारमध्ये भर दुपारी घरात घुसून दागिने चोरणाऱ्या चोरट्यास घरमालक आणि परिसरातील नागरिकांनी ...

Public beating of the thief of Bhardupari jewelery | भरदुपारी दागिने चोरणाऱ्यास पब्लिक मार

भरदुपारी दागिने चोरणाऱ्यास पब्लिक मार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील विरल विहारमध्ये भर दुपारी घरात घुसून दागिने चोरणाऱ्या चोरट्यास घरमालक आणि परिसरातील नागरिकांनी पकडून चोप देत पोलीसांच्या स्वाधीन केले़ रविवारी सकाळी १० ते दुपारी दोन वाजेदरम्यान हा प्रकार घडला़ ताब्यात घेण्यात आलेला चोरटा हा हिस्ट्रीशिटर असून त्याच्याविरोधात जिल्ह्यात विविध गुन्हे दाखल आहेत़
संतोष दिलीप तिजविज रा़ चांभारवाडा असे चोरट्याचे नाव आहे़ रविवारी सकाळी त्याने विरल विहारमधील संतोषी माता मंदिराजवळील इंदिरा हनुमानराम चौधरी यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला होता़ यावेळी त्याने घरातील कपाट फोडून आतील तिजोरीत ठेवलेले १ लाख रुपये किमतीचे ४ तोळे सोन्याचे दागिने काढून घेतले होते़ याचदरम्यान घरमालक इंदिरा चौधरी ह्या त्यांच्या आईसह घरी परतल्या होत्या़ घराला कुलूप नसल्याचे पाहून त्या चकीत झाल्या होत्या़ त्या घरात गेल्या असता संतोष तिजविज हा घरातील वस्तू चोरी करत असल्याचे त्यांना दिसून आले़ दोघींनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता, त्याने दोघांना धक्का देत पळ काढला होता़ यावेळी आरडओरड सुरु झाल्याने याच भागात राहणारे राजकुमार सुकलाल जैन व मदनलाल जैन यांनी त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले़ दरम्यान महिलांना धक्का देत पळ काढणाºया चोरट्यास परिसरातील रहिवाशांनी बेदम चोप दिला होता़ या प्रकाराची माहिती शहर पोलीस ठाण्यात मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार व पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांनी याठिकाणी भेट देत चोरट्यास ताब्यात घेतले़ त्याच्याविरोधात इंदिरा चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ चोरटा संतोष याने धक्का दिल्याने इंदिरा व मतराबाई ह्या जखमी झाल्या आहेत़


दरम्यान पोलीसांनी रविवारी रात्री उशिरा संतोष तिजविज यास अटक करुन त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता़ सोमवारी सकाळी त्याला शहर पोलीसांनी सोमवारी न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाकडून सुनावण्यात आली़ संतोष तिजविज याच्याविरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे़ वेळोवेळी शहरातील घरफोडीच्या घटनेत त्याचे नाव समोर आले आहे़

Web Title: Public beating of the thief of Bhardupari jewelery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.