कृषीदुतांद्वारे जवखेडा येथे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:19 IST2021-07-24T04:19:35+5:302021-07-24T04:19:35+5:30
कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबविला जात आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीअंतर्गत शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक ...

कृषीदुतांद्वारे जवखेडा येथे जनजागृती
कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबविला जात आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीअंतर्गत शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेला हिमांशू धर्मेंद्र पटेल याने शहादा तालुक्यातील जवखेडा येथे जाऊन शेतकऱ्यांना पीक पद्धती व वित्त पुरवठा, आधुनिक पीक लागवड पद्धती व शेतीला वित्त पुरवठा करणाऱ्या बाबींचीही माहिती दिली. यावेळी कृषी भूषण शेतकरी हिरालाल पाटील, बन्सीलाल पाटील, भरत पाटील, सांबर ठाकरे, देवा पाडवी आदी शेतकरी उपस्थित होते. शहादा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एल. पटेल, प्रा. डॉ. बी. सी. चौधरी, प्रा. डॉ. ए. बी. पाटील, प्रा. संदीप पाटील, प्रा. सी. यु. पाटील, एस. आर. चौधरी मार्गदर्शन लाभले.