नगरसेवकांकडून पाणी बचतीबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 13:09 IST2019-06-23T13:09:00+5:302019-06-23T13:09:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शहरातील पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रभागातील दोन्ही नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात पाणी बचतीबाबत जनजागृती केली. एवढेच ...

नगरसेवकांकडून पाणी बचतीबाबत जनजागृती
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : शहरातील पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रभागातील दोन्ही नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात पाणी बचतीबाबत जनजागृती केली. एवढेच नव्हे तर त्यांच्या स्वत:च्या खर्चातून ज्याठिकाणी नळांना तोटय़ा नाही अशा ठिकाणी नळ बसवून दिले आहेत. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले जात असून नागरिकांनीही पाणी बचतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
तळोदा शहरातील प्रभाग क्रमांक दोनमधील नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी व स्वीकृत नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी यांनी सध्या तळोदा शहरात पाणीटंचाईबाबत नागरिकांमध्ये घरोघरी जाऊन जनजागृती केली. पाणी बचत करण्याची आज काळाची गरज बनली आहे. प्रभागात बहुतेक ठिकाणी खाजगी नळांना तोटय़ा नाहीत. त्यामुळे पाणी वाया जात असल्याने पाणी वाया जाते. साहजिकच मोठय़ा प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असून तात्काळ तोटय़ा बसविण्याचे आवाहन करून या दोन्ही नगरसेवकांनी आपल्या स्वखर्चातून ठिकठिकाणी जवळपास 40 ते 45 नवे नळ बसवून दिले आहेत. आपल्या प्रभागातील समस्या व प्रश्नांबाबत हे नगरसेवक नेहमीच जागृत राहतात. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी हेल्पलाईनदेखील सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लागत असल्याचे तेथील रहिवाशी सांगतात.