महावॉकेथॉन रॅलीतून रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 11:32 IST2018-11-19T11:32:47+5:302018-11-19T11:32:51+5:30
नंदुरबार : प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी रविवारी महावॉकेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होत़े रॅलीत प्रशासकीय अधिकारी ...

महावॉकेथॉन रॅलीतून रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती
नंदुरबार : प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी रविवारी महावॉकेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होत़े रॅलीत प्रशासकीय अधिकारी व कर्मचा:यांनी सहभाग नोंदवला़
आरटीओ कार्यालयापासून या रॅलीला सुरुवात करण्यात आली़ यावेळी जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधिक्षक संजय पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब डी़बच्छाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल पवार, उपविभागीय अधिकारी रमेश पवार, वाहतूक पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत़े नवापूर चौफुली, साक्रीनाका, बागवानगल्ली, जळकाबाजार व या मार्गाने जिल्हा पोलीस मैदानावर या रॅलीचा समारोप करण्यात आला़ रस्ता सुरक्षा, नो हॉर्न व सुरक्षित वाहन चालवण्यासाठी जनजागृती करण्याबाबत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होत़े