गरजू रुग्णांना नि:शुल्क ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:23 IST2021-06-05T04:23:02+5:302021-06-05T04:23:02+5:30
सध्या कोरोनामुळे अनेक रुग्णांना श्वसनाचा त्रास होत असल्याने, ऑक्सिन सॅच्युरेशन मेंटेंन करण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची आवश्यकता भासते. अनेक रुग्णांना हे ...

गरजू रुग्णांना नि:शुल्क ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देणार
सध्या कोरोनामुळे अनेक रुग्णांना श्वसनाचा त्रास होत असल्याने, ऑक्सिन सॅच्युरेशन मेंटेंन करण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची आवश्यकता भासते. अनेक रुग्णांना हे विकत किंवा भाड्याने घ्यावे लागते. रोजचे किमान भाडे अधिक असल्याने सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना हे न परवडणारे किंवा खर्चिक असल्याने जयनगर येथील रहिवासी व सध्या पुणे येथे स्थायिक असलेले उद्योजक महेंद्र नवनित पटेल (माजी उपाध्यक्ष, केदारेश्वर प्रतिष्ठान, जीसीसीए व व्हीसीजीजीएम सदस्य) यांनी समाजसेवेची व मातीची जाण ठेवून परदेशातून एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मागवून शहादा येथे व्हीएसजीजीएम संस्थेला प्रदान करण्यात आले. या प्रसंगी पियू बाल रुग्णालयाचे संचालक, बालरोग तज्ज्ञ डॉ.प्रदीप पाटील, समाजसेवक गणेश उत्तम पाटील, केडीपीच्या अध्यक्षा हेमलता पाटील, केडीपी सदस्य रतीलाल पाटील, जितेंद्र पाटील, व्हीएसजीजीएम सदस्य हितेशचंद्र पाटील (मुंबई), संदीप पाटील, शहादा विभाग प्रमुख योगेश पाटील, हितेश पटेल, डॉ.प्रफुल्ल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
तरी सर्वसामान्य कुटुंबातील ज्या रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची आवश्यक्ता असल्यास त्यांनी व्हीएसजीजीएम,केडिपीच्या सदस्यांना संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले. उपलब्धतेनुसार गरजू समाजबांधवांना हे निशुल्क उपलब्ध करून देण्यात येईल.